ब्रिटन : येथे पीएचडी करणारा विद्यार्थी हॅरी डेस्टेक्रो (31) रातोरात अरबपती बनला आहे. त्याची बायोटेक फर्म जीईलोला डेन्मार्कच्या औषधनिर्माण कंपनीने तब्बल 5588 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. महत्वाचे म्हणजे चार वर्षांपूर्वीच हॅरीने त्याचा प्राध्यापक अँथनी डेविसच्या मदतीने जीईलोची स्थापना केली होती.
नोवो नोरडिस्क ही डेन्मार्कची कंपनी आहे. या कंपनीनेच प्रथम इन्सुलिनच्या इंजेक्शनची निर्मिती केली होती. या व्यवहारामुळे मधुमेहाच्या इलाजासाठी मदत मिळणार असल्याचे ब्रिस्टल युनिव्हर्सिटीकडून सांगण्यात आले.
जीईलोच्या संचालकांनी सांगितले की, ही कंपनी पुढील दशकामध्ये मधुमेहाच्या उपचारांसाठी मोठी भुमिका निभावणार आहे. जगभरात 38 कोटींपेक्षा जास्त मधुमेही रुग्ण आहेत. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार भारतात 2025 पर्यंत भारतात 13 कोटींवर मधुमेही रुग्ण आढळतील. मधुमेहाच्या दुसऱ्या प्रकारामध्ये इन्सुलिनच्या इंजेक्शनचा वापर केला जातो.
जीईलोने रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक कमी झाल्यास ते पुन्हा नियंत्रित करण्यासाठी तंत्रज्ञान विकिसत केले आहे. या कंपनीने ग्लुकोजच्या शीघ्र प्रतिसाद देणारे इन्सुलिन तयार केले आहे. जे शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होईपर्यंत रक्तात तसेच निष्क्रिय राहणार आहे.