(Image Credit : Active.com)
आपल्या शरीरासाठी फॉस्फरस अत्यंत आवश्यक आहे. शरीरामध्ये याचे योग्य प्रमाण असेल तर शरीराचं कार्य सुरळीत होण्यास मदत होते. तसं पाहायला गेलं तर शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी अनेक घटक आवश्यक असतात. परंतु फॉस्फरसच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका व्यक्तीला आपलं उत्तम आरोग्यासाठी दररोज 700 मिलीग्रॅम फास्फोरस गरज असते.
फॉस्फरस असं तत्व आहे, ज्यामुळे आपल्या किडनीचं काम उत्तम प्रकारे चालण्यास मदत होते. याव्यतिरिक्त हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठीही हे तत्व अत्यंत फायदेशीर ठरतं. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता भासते. त्यावेळी हाडं ठिसूळ होतात. त्याचबरोबर ऑर्थरायटिस, दात कमकुवत होतात आणि हिरड्यांना सूज येणं यांसारख्या समस्या होतात. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे भूक कमी होणं आणि इतर संक्रमणही होऊ शकतात.
जर पदार्थ योग्य पद्धतीने शिजवले नाही तर फॉस्फरसयुक्त पदार्थांमधील पौष्टिक तत्व नष्ट होतात. ताज्या भाज्यांना जास्त तापमानावर शिजवल्याने पोषक तत्व नष्ट होतात. जर तुम्हाला फळांमधून संपूर्ण पौष्टिक तत्व मिळवायची असतील तर तुम्ही त्यांचा ज्यूस पिण्याऐवजी ती कच्ची खाणं फायदेशीर ठरतं. मासे, अंडी तयार करताना खूप तेल किंवा तूप वापरू नका.
गहू :
गव्हापासून तयार करण्यात आलेल्या ब्रेडच्या एका स्लाइसमध्ये 57 मिलीग्रॅम फॉस्फरस असतं. त्यामुळे शरीरामध्ये फॉस्फरसचे प्रमाण वाढवायचे असेल तर व्हिट ब्रेडचा आहारामध्ये समावश करा.
चिकन :
75 ग्रॅम चिकनमध्ये 370 ग्रॅम फॉस्फरस असतं. त्यामुळे तुम्ही चिकनची तुलना व्हिट ब्रेड किंवा मंच नट्ससोबत करू शकता. चिकनमार्फत दररोजच्या आहारातील फॉस्फरसची तुलना पूर्ण करू शकता.
दुधीभोपळा :
भूक लागल्यानंतर अनेकजण दूधीभोपळ्याच्या बिया खातात. नियमित 100 ग्रॅम या बियांचे सेवन केलं तर 100 ग्रॅम दुधीभोपळ्याच्या बियांमध्ये 100 मिलीग्रॅम फॉस्फरस असतं.
- ज्या लोकांचं वजन सलवकर वाढतं, त्यांच्यामध्ये फॉस्फरस मेटाबॉलिज्म सामान्य ठेवण्याचं काम करतं.
- फॉस्फरस शरीरात जमलेले फॅट्स बर्न करण्यासाठी मदत करतात.
- शरीरातील जास्त असलेल्या कॅलरी बर्न करण्यासाठी फॉस्फरस मदत करतं.