Plant Based Diet: डायबिटीज (Diabetes), कोलेस्ट्रॉल (Cholesterol) आणि हृदयरोग यांसारख्या समस्यांपासून बचाव करायचा असेल तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये बदल करावा लागेल. तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये अशा काही अशा फूड्सचा समावेश करावा ज्याने तुम्हाला या समस्या होणार नाहीत. अनेक शोधातून समोर आलं आहे की, प्लांट बेस्ड डाएट आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही प्लांट बेस्ड डाएटचा सेवन करत नसाल तर आजच त्याची सुरूवात करा. डाएटमध्ये फळ, भाज्या, बीन्स आणि कडधान्याचा समावेश करा.
डाएटमध्ये कशाचा करावा समावेश?
- फळं खाल्ल्याने मेंटल हेल्थ चांगली राहते. जास्तीत जास्त लोकांना फळं खाणं आवडतं. फळं-भाज्या खाल्ल्याने मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं राहतं. फळ आणि भाज्यांमध्ये एंटीऑक्सीडेंट, फाइबर आणि पोषक तत्व भरपूर असतात. फळं आणि भाज्या नियमित खाल्ल्याने तणाव कमी होतो.
- शरीराला प्रोटीनची फार आवश्यकता असते. हे तुम्हाला प्लांट बेस्ड फूडमधून जास्तीत जास्त मिळतात. प्रोटीनचं सेवन केल्याने तुम्हाला कमजोरी जाणवणार नाही. प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी कडधान्य, नट, बीन्स आणि शेंगांचं सेवन करू शकता.
- हिरव्या भाज्या खाल्ल्याने डायबिटीसचा धोका कमी होतो. शोधानुसार, अशा लोकांमध्ये टाइप 2 डायबिटीसचा धोका जास्त असतो जे लोक प्लांट बेस्ड डाएटऐवजी प्रोसेस्ड फूड, मीट आणि फिशचं सेवन करतात. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये प्लांट बेस्ड फळं, भाज्या, नट्स आणि कडधान्य यांचा समावेश करा.
- कलिंगड हृदयासाठी चांगलं असतं. कलिंगड मेटाबॉलिक हेल्थसाठी चांगलं असतं. कलिंगडात भरपूर पोषक तत्व असतात. कलिंगडात अमीनो अॅसिड नाइट्रिक ऑक्साइड आढळतं. हे एक नॅच्युलर कंपाउंड आहे. याने धमण्या मोकळ्या होतात. त्याशिवाय कलिंगडात पॉलीफेनोल्स, लाइकोपीन, मॅग्नेशियम आढळतं. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतं.