शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

CoronaVirus News : तीन उपायांच्या मदतीनं सरकार कोरोनाला थोपवणार; लढ्याला यश मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 2:51 AM

अशा व्यक्तींच्या शरीरातील प्लाझमा कोरोना रुग्णांना दिल्यास त्यांना त्याचा फायदा होतो. तेही या आजारातून लवकर बरे होतात असे दिसून आले आहे.

एस. के. गुप्तानवी दिल्ली : दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने तीन गोष्टींच्या साहाय्याने या आजाराविरोधात अधिक तीव्र लढा देण्याचे ठरविले आहे. कोरोना रुग्णांची अँटिजन किटच्या साहाय्याने चाचणी करणे, या रुग्णांवरील उपचारांत प्लाझमा थेरपीचा वापर तसेच रुग्णांलयामध्ये खाटांसाठी लावण्यात येणाऱ्या शुल्काला चाप लावणे अशा तीन उपाययोजना केल्या आहेत.दिल्लीत खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचारांपोटी किती पैसे आकारावेत याचे प्रमाण सरकारने ठरवून दिले आहे. त्यामुळे सर्व खासगी रुग्णालयांत आता समान दर असतील.दिल्लीमधील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना चाचण्यांचे अहवाल लवकर मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी दिल्लीत अँटिजन किटद्वारे चाचणी करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यातच घेण्यात आला. या चाचणीसाठी लागणारा किट दक्षिण कोरियातील एका कंपनीने बनविला आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तात अँटीबॉडिज तयार झालेल्या असतात. अशा व्यक्तींच्या शरीरातील प्लाझमा कोरोना रुग्णांना दिल्यास त्यांना त्याचा फायदा होतो. तेही या आजारातून लवकर बरे होतात असे दिसून आले आहे.>दिल्लीकरांना मिळाला दिलासारुग्णालयांतील एकूण खाटांपैकी ६० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयामुळे दिल्लीतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी सांगितले की, कोरोनाच्या रुग्णांना दाखल करून घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेल्या नियमांचे खासगी रुग्णालयांनी पालन करावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस