शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

प्लास्टिक फक्त पर्यायवरणासाठीच नाही आरोग्यासाठीही धोकादायक, शरीराची होते अपरिमित हानी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 6:07 PM

प्लास्टिकमुळे फक्त पर्यावरणाचीच नाही तर आपल्या शरीराचीदेखील हानी होते. प्लास्टिकचे मानवी आरोग्यावर विविध वाईट परिणाम होतात.

प्लास्टिक (Plastic) ही गोष्ट आपल्या जीवनशैलीचा (Lifestyle) एक महत्त्वाचा भाग झाली आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात असंख्य कारणांसाठी प्लास्टिक वापरलं जातं. प्लास्टिक पर्यावरणासाठी (Environment) घातक आहे. प्लास्टिकमुळे फक्त पर्यावरणाचीच नाही तर आपल्या शरीराचीदेखील हानी होते. प्लास्टिकचे मानवी आरोग्यावर विविध वाईट परिणाम होतात.

पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर प्लास्टिकचा वाईट परिणाम होतो. आपण वापरत असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये आढळणारं फॅलेट्स (Phthalates) पुरुषांमधील टेस्टेस्टेरॉनचं उत्पादन कमी करतात. टेस्टेस्टेरॉन हे पुरुषांमध्ये स्पर्माटोझा (Spermatozoa) तयार होण्यास उत्तेजन देणारं हार्मोन आहे. प्लास्टिकचा आणखी एक घातक परिणाम समोर आला आहे. प्लास्टिकमुळे लठ्ठपणासुद्धा वाढतो. अलीकडील काळात झालेल्या संशोधनात असं दिसून आलं आहं की, प्लास्टिकमधील संयुगं (Compounds) आपल्या चयापचय क्रियेमध्ये व्यत्यय आणू शकतात. त्यामुळे वजन वाढण्यासाठीही (Weight Gain) प्लास्टिक कारणीभूत ठरू शकतं.

नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Norwegian University of Science and Technology) आणि फ्रँकफर्टमधील गोथे युनिव्हर्सिटीतील (Goethe University in Frankfurt) रिसर्चर्सनी एकत्रितपणे केलेल्या स्टडीमध्ये (Study) प्लास्टिकचा नवीन घातक परिणाम समोर आला आहे. या स्टडीदरम्यान, दह्याचे कंटेनर (Yogurt containers), पाण्याच्या बाटल्या (Water Bottles), स्वयंपाकघरातील स्पंज अशा दैनंदिन वापरातील एकूण ३४ वस्तूंचा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक वस्तूमध्ये ५५ हजारांपेक्षा जास्त केमिकल काँपोनंट्स (Chemical Components) आढळले.

आयडेंटिफाय केलेल्या ६२९ घटकांपैकी ११ घटक हे चयापचय (metabolism) क्रियेवर परिणाम करणारे घटक म्हणून ओळखले जातात. त्याहूनही वाईट म्हणजे हे घटक लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. प्लास्टिकमध्ये असलेल्या एक तृतीयांश केमिकल काँपोनंट्सनी लिपिड संचयन करणाऱ्या पेशींच्या विकासास हातभार लावल्याचं रिसर्चर्सच्या निदर्शनास आलं आहे. या काँपोनंट्सच्या उपस्थितीमुळे पेशींची संख्या वाढते आणि अधिक चरबी जमा होते, हे स्टडीमध्ये लक्षात आलं आहे.

सर्वांत जास्त चिंताजनक बाब म्हणजे, प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये अशी काही रसायनं आढळली आहेत जी पूर्वी घातक असल्याचं माहिती नव्हतं. परंतु, आता या रसायनांमुळे चरबी वाढण्यास कारणीभूत असलेल्या पेशींचा (Fat cells) विकास होतो, हे स्पष्ट झालं आहे.

प्लास्टिकमधील घटक अन्नामध्ये जाऊ शकतात, हे या पूर्वीच सिद्ध झालेलं आहे. विशेषतः जेव्हा प्लास्टिक कंटेनरमध्ये गरम खाद्यपदार्थ भरले जातात तेव्हा हा प्रकार घडण्याची सर्वात जास्त शक्यता असते. त्यामुळे प्लास्टिकमध्ये खाद्यपदार्थ पॅक करणं टाळलं पाहिजे आणि अशा कटेनरमधलं अन्न शक्य तितक्या कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स