पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ममल्लापुरमच्या दौऱ्यावर असताना तेथील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोदींनी तिथे स्वच्छता अभियानाची सुरुवातही केली. त्यावेळी त्यांच्या हातात एक लाकडाचा छोटासा डम्बेलप्रमाणे दिसणारी काहीतरी वस्तू होती. पंतप्रधान ती वस्तू आपल्या हातांवर रोल करत होते. अनेक लोकांना ते नेमकं काय होतं ते समजलं नाही. स्वतः पंतप्रधानांनी ट्वीट करून सांगितलं की त्यांना अनेक लोकांनी विचारलं की त्यांच्या हातात असणारी वस्तू नेमकी होती कोणती? मोदींनी अनेकांच्या शंकेचं निरसन करताना तो अॅक्युप्रेशर रोलर असल्याचे सांगितले. तसेच तो रोलर फार उपयोगी असल्याचेही त्यांनी सांगितले.
जाणून घेऊया अॅक्युप्रेशर रोलरच्या फायद्यांबाबत...
काय आहे अॅक्युप्रेशरचा सिद्धांत?
अॅक्युप्रेशरचा मुख्य सिद्धांत हा आहे की, मानवाच्या शरीराचा प्रत्येक अवयव त्यांच्या हाताच्या तळव्याशी आणि पायांच्या तळव्याच्या एका खास पॉइंटशी जोडलेला असतो. दरम्यान याचा संबंध काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. या पॉइंट्सला एनर्जी दिली तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, असा दावा करण्यात येतो. परंतु ही गोष्ट अद्याप सिद्ध झालेली नाही.
आजार होतात दूर...
प्रेशर पॉइंट्सवर एनर्जी दिल्याने ही थेट संबंधित अवयवांपर्यंत पोहोचते आणि समस्यांपासून सुटकाही मिळते. असा दावा करण्यात येतो की, असं केल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होते.
असा करा वापर...
पंतप्रधान नेरंद्र मोदीच्या हातात एक अॅक्युप्रेशर रोलर होतात. या रोलरवर काही पॉइंट्स होते. जेव्हा तुम्ही दोन्ही हातांमध्ये किंवा पायावर ठेवून या रोलरचा वापर करता. तेव्हा प्रेशर पॉइंट्स अॅक्टिव्ह होतात आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत ऊर्जा पोहोचते.
हाताचे प्रेशर पॉइंट्स
अंगठ्याच्या खालच्या बाजूस तळव्यावर हा प्रेशर पॉइंट असतो. हा तणाव कमी करण्यासाठी आणि भावना नियंत्रित करण्यासाठी हा पॉइंट मदत करतो. वजन वाढविणं आणि डायबिटीस होण्याचं एक मुख्य कारण तणावही आहे. त्यामुळे रोलरने मसाज केल्याने फायदा होतो.
फायदे
जर तुम्ही नियमितपणे हात आणि पायांच्या पॉइंट्सवर प्रेशर देत असाल तर तुमचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. जर एखाद्या प्रेशर पॉइंटवर जोर दिल्याने वेदना होत असतील तर समजुन जा की, काहीतरी समस्या आहे. त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
दररोज 5 मिनिटं केल्यानेही होतात फायदे...
अॅक्युप्रेशर रोलरमुळे डायबिटीस, स्ट्रेस आणि झोप न येण्याची समस्या, हायपरटेन्शन, हार्टच्या समस्यांमध्ये फायदा होतो. त्यासाठी फक्त दररोज 5 मिनिटं अॅक्युप्रेशर करा.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)