Pollution free plants : तापमान कमी होणे आणि हवेचा वेग कमी होण्यासोबतच दिल्लीसोबतच देशातील अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता फारच खराब झाली आहे. प्रदूषणामुळे मोकळेपणाने श्वास घेणं अवघड होत आहे. लोक घरातील हवा स्वच्छ करण्यासाठी महागडे प्युरिफायर खरेदी करत आहेत. लोकांसाठी हा पर्याय परवडणारा नाही. अशात प्रदूषण दूर करणारे आणि हवा शुद्ध ठेवणारी काही झाडे घरात लावू शकता.
ही झाडे तुम्ही बाल्कनीपासून ते किचनपर्यंत कुठेही ठेवू शकता. या झाडांना जास्त काळजी घेण्याचीही गरज नसते. ते कमी प्रकाशातही चांगले वाढतात आणि प्रदूषणाचे तत्व कमी करण्यास मदत करतात. आम्ही तुम्हाला तीन झाडांबाबत सांगणार आहोत ज्याने तुम्ही हवा शुद्ध ठेवू शकता.
स्नेक प्लांट
स्नेक ज्याला संसेविया ट्रिफ़सिआटा असंही म्हटलं जातं. मुख्यपणे आशिया आणि आफ्रिकेत हे झाड आढळून येतं. याची पाने नेहमीच हिरवी आणि तलवारीसारखी दिसतात. स्नेक प्लांट घरात लावून तुम्हाला जास्त फायदा हा होतो की, हे घरातील हवा शुद्ध ठेवतात. घरातील विषारी हवा दूर करण्यास मदत करतात. स्नेक प्लांट Co2, बेंजीन, फॉर्मलाडिहाइड, जायलिन आणि टोल्यूनिसही कॅन्सर निर्माण करणाऱ्या तत्वांना दूर करतो.
स्पायडर प्लांट
स्पायडर प्लांटही तुम्ही घरात लावू शकता. याला उन्हाची आणि मेंटनेंसची फार कमी गरज असते. या झाडामुळे हवेतील विषार गॅस कमी करतं व हवा शुद्ध करतं. तसेच या झाडामुळे घरातील ऑक्सिजनचं प्रमाणही वाढतं. जर तुम्ही नेहमीच तणावात राहत असाल तर स्पायडर प्लांट नक्की लावा.
मनी प्लांट
मनी प्लांटही एअर प्युरिफायरच्या रूपात काम करतं. तसेच धार्मिक रूपानेही हे झाड घरात आणणं शुभ मानलं जातं. याने भरभराटी येते असं मानलं जातं. दुसरीकडे हे झाड एक फार चांगलं प्युरिफायर म्हणून काम करतं. घरातील दुषित तत्व दूर करण्याचं हे झाड काम करतं आणि हवा शुद्ध करतं.