आता कोरोना रूग्णांमध्ये केस गळणे (Hair Loss) ही आणखी एक समस्या दिसून येत आहे. एका नवीन संशोधनादरम्यान ही बाब समोर आली आहे. (Post Covid-19 hair loss)
कोरोना आणि केस गळतीची समस्याकोरोना आणि केस गळती यांच्यात काय संबंध आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ञांनी सखोल अभ्यास केला. या अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, कोरोनामुळे बऱ्याच लोकांचे केस प्रचंड प्रमाणात गळायला लागले आहेत.
इंडियन युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अॅन्ड सर्व्हायवर कॉर्प फेसबुकचे प्रोफेसर नताली लॅमबर्ट यांच्या टीमने यासंदर्भात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात १५०० लोकांचा समावेश होता. सर्व्हेमध्ये सामील असलेल्या सर्व लोकांना बऱ्याच काळासाठी कोरोनाची लागण झाली होती. या आजारातून बरे झाल्यानंतरही त्याचा परिणाम बर्याच दिवसांपर्यंत दिसून आला. या अभ्यासाच्या अहवालानुसार, सर्वेक्षणात सामील झालेल्या २५ लोकांमध्ये केस गळतीची समस्या आढळली. या दरम्यान, सर्दी आणि नाक बंद होण्याच्या समस्येपेक्षा केस गळतीची समस्या अधिक असल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले.केस गळतीचे मुख्य कारणया संशोधनानंतर, कोरोना रूग्णाचे केस इतके कसे गळतात, याबद्द्ल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु यामागचे वैज्ञानिक कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु काही अभ्यासकांनी, कोरोना काळातील ताण आणि तणाव हेच केस गळतीचे मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे. या स्थितीस ‘टेलोजेन इफ्लुव्हियम’ असे देखील म्हणतात. टेलोजेन इफ्लुव्हियममध्ये कोणत्याही रोग किंवा ताण- तणावामुळे काही काळ केस गळतीची समस्या निर्माण होते. याशिवाय संसर्गाच्या वेळी पौष्टिक आहाराअभावीही आपले केसही गळू शकतात.बचाव कसा कराल?तज्ञाच्या सूचनेनुसार, कोरोनामुळे केस गळणे हे केवळ तात्पुरत्या स्वरुपात असू शकते. यावेळी, रुग्णाने आपला ताण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या व्यतिरिक्त आपला आहार सर्वात महत्त्वाचा आहे. यादरम्यान, व्हिटॅमिन-डी आणि आयर्न युक्त, पौष्टिक घटक असलेले आरोग्यदायी अन्न आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम आहे. यातून मिळणारी रोग प्रतिकारशक्तीच आपल्याला या विषाणूशी लढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.डाएटमध्ये प्रोटीन घ्याअशा केसगळतीमध्ये साधारणपणे एका दिवसात १०० केस तुटतात. मात्र, अशा परिस्थितीत रोज ३०० ते ४०० केस तुटतात. त्यामुळे कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांनी पोषक तत्त्व घेण्याचा सल्ला दिला जातो. आहारात प्रोटीनचा अधिक समावेश केला पाहिजे.