उन्हाळा आला की प्रत्येकजण घामानं हैराण झालेला असतो. मांड्या, काखेत, मानेवर घाम जमा झाल्यामुळे तीव्रतेने खाज येते. अनेकदा या खाजेचं रुपातर घामोळ्या किंवा फंगल इन्फेक्शनमध्ये होतं. या प्रकारचे इन्फेक्शन झाल्यानंतर त्वचेवर वर्तुळाकार किंवा अंगठीप्रमाणे लालसर चट्टे उठतात. हळूहळू त्यावर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होतात.
अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी पुरेशी जागा नसते. यामुळे कपडयाखाली नीट स्वच्छता राहत नाही. किंवा अंग ओलं असताना कपडे घातले जातात. यामुळे त्वचेच्या काही भागांवर खरूज, नायटा, गजकर्ण वाढतात. आज आम्ही तुम्हाला फंगल इन्फेक्शनपासून बचावासाठी काही उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही त्वचेच्या समस्या टाळू शकता.
काय आहे म्यूकोसिस
'ब्लॅक फंगस किंवा म्यूकोमायकोसिस हा नवीन रोग नाही. हे केवळ नाक, कान आणि घशालाच नव्हे तर शरीराच्या इतर भागांनाही नुकसान करते, परंतु गेल्या काही दिवसांपासून हा रोग मोठ्या प्रमाणात रूप धारण करीत आहे, कारण हा रोग रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे होतो. पूर्वी हा रोग केमोथेरपी, अनियंत्रित मधुमेह, प्रत्यारोपणाच्या रूग्ण आणि वृद्ध लोकांमध्ये दिसायचा. पण आता कोविड १९ च्या रुग्णांमध्येही हा आजार दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते बुरशीमुळे डोळ्यातील सूज येते, ज्यामुळे एक किंवा दोन दिवसात डोळ्यांचा प्रकाश कमी होतो. बहुतेक रूग्णांची दृष्टी कमी झाली आहे.
खाजेमुळे उद्भणाऱ्या फंगल इन्फेक्शनची लक्षणं
त्वचेवर तीव्रतेनं खाज येणे.
त्वचेवर लाल रंगाचे गोल चट्टे येणे.
त्वचेतून पांढऱ्या रंगाचा पदार्थ निघणे, भेगा पडणे, फटी पडणे.
सतत केस गळणे.
नखं पिवळी किंवा काळे पडणे.
फंगल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी उपाय
घट्ट कपडे घालू नका.
ओले मोजे घालू नका दररोज कपडे आणि यांना उन्हात वाळवा.
नेहमी सैल आणि सुती कपडे घालणे चांगले आहे.
"तीन प्रकारात विभागला 'डबल म्यूटेंट' व्हायरस", जाणून घ्या संपूर्ण माहिती...
वेळच्यावेळी नखं कापा.
दुसऱ्यांचे कपडे घालू नका.
दुसऱ्यांचे कपडे, कंगवा, टॉवेल वापरू नका. याचा उपचार मध्येच सोडू नका. नाहीतर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
कडक सॅल्यूट! कोरोनामुळे एकुलता एक मुलगा गमावला; 15 लाखांची FD मोडून दाम्पत्य करतंय रुग्णांची सेवा
शक्यतो ऑफीसला जाणाऱ्या स्त्रीयांनी वेस्टन पध्दतीच्या शौचालयाचा वापर टाळावा. कारण त्या शौचालयात अवयवांशी थेट संपर्क येत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे.