(Image Credit : All4Women)
सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे काम करणं तर सोपं झालं आहेच, परंतु नात्यांमध्ये दुरावा आला आहे. आधी जिथे आई-वडिल आपल्या मुलांना वेळ देत असतं. त्यांना गोष्टी सांगत असत, त्यांच्याबरोबर खेळत असतं, एवढंच नाही तर मुलांचा अभ्यासही घेत असतं. पण आता तंत्रज्ञानामुळे या सर्व गोष्टींमध्ये वेगाने बदल घडून आले आहेत. अनेक पालक आपल्या ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना मुलांचा अभ्यास घेणंही शक्य होत नाही. परिणामी मुलांच्या हातात ई-बुक किंवा इतर गॅझेट्स देतात.
(Image Credit : The Star)
एका नव्या संशोधनाच्या अहवालातून सिद्ध झाल्यानुसार, जे आई-वडिल आपल्या मुलांना पुस्तकांऐवजी ई-बुक वापरण्यासाठी किंवा अभ्यासासाठी देतात त्यांच्या मुलांचं लक्ष अभ्यासाऐवजी तंत्रज्ञान अवगत करण्याकडे अधिक असतं.
(Image Credit : MenaFN.com)
यूनिवर्सिटी ऑफ मिशिगनच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनादरम्यान, 37 पालकांसोबत त्यांच्या मुलांना सहभागी केलं होतं. दरम्यान, या संशोधनामध्ये संशोधकांनी तीन गोष्टींवर लक्ष दिलं. त्यातील एक म्हणजे, प्रिंट बुक, इलेक्ट्रॉनिक बुक आणि अॅडवान्स इलेक्ट्रॉनिक बुक ज्यांमध्ये साउंडसोबत अॅनिमेशनचाही सहभाग असेल अशा बुक्सचा आधार घेतला.
संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, जे आई-वडिल मुलांना ई-बुकच्या माध्यामातून शिकवतात. त्यांच्या मुलांचं लक्ष अभ्यासामध्ये कमी आणि टेक्नॉलॉजीमध्ये जास्त असतं. याच कारणामुळे मुलं अभ्यासामध्ये जास्त लक्ष देऊ शकत नाही. तसेच पालकही तेवढ्या प्रभावीपणे त्यांना शिकवण्यास कमी पडतात.
संशोधनाच्या संशोधकांनी डॉक्टर मुनजर सांगतात की, पालकांचं मुलांशी बोलणं आणि त्यांना शिकवणं यांमुळे मुलांमध्ये लॅग्वेज स्किल्स विकसित होतात. त्याचबरोबर मुलांचं आपल्या पालकांसोबतचं नातंही आणखी मजबुत होतं. डॉक्टर मुनजर यांनी पुढे बोलताना सांगितले की, पुस्तकांमधून शिकताना मुलांना जे अनुभव मिळतात. त्यांना ते बऱ्याच दिवसांसाठी लक्षात ठेवतात. याव्यतिरिक्त मुलांची बौद्धिक क्षमताही विकसित होण्यास मदत होते. ज्या कारणामुळे ते नवीन गोष्टी अगदी सहज शिकतात.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या आहेत. आम्ही त्याबाबत कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.