आपल्या शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी आपलं पोट नेहमी साफ आणि चांगले असणे खूप महत्वाचे आहे. मात्र पोटाच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने बद्धकोष्ठतेसारखे आजार उद्भवतात. आयुर्वेदानुसार, चुकीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची तक्रार उद्भवू शकते. ज्या लोकांना बद्धकोष्ठता त्रास आहे त्यांनी दररोज योग्य आहार घेतला पाहिजे. तसंच बर्याच वेळा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बद्धकोष्ठतेने ग्रस्त रूग्णांसाठी कोणते आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरतील हे जाणून घेऊया.
बेलतज्ज्ञांच्या मते, बेल पोटाला थंड ठेवतं आणि त्यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यासाठी मदत करतात. तुम्हाला हवं असल्यास बेलच्या प्लपचंही सेवन करू शकता. याचं तुम्ही सरबतही करू शकता.
त्रिफळंहे असे आयुर्वेदिक औषध आहे ज्याचा उपयोग करून अनेक आरोग्यविषयक समस्यांवर मात करता येते. तसंच हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यात प्रभावी असल्याचं सिद्ध आहे. तसेच यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. एक कप गरम पाण्यात एक चमचा त्रिफळं १० मिनिटं ठेवा. त्यानंतर फिल्टर करून हे पाणी प्यावं. असे केल्यास बद्धकोष्ठता दोन आठवड्यात बरी होते.
अंजीरअंजीरात सॉल्यूबल फायबर असतं. जे शौचाची प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करतं. यासह, त्याचं सेवन पोट साफ करतं. अंजीर रात्रभर पाण्याच भिजवून ठेवल्यावर सकाळी त्यांचं सेवन करा. असं केल्यास बद्धकोष्ठतेने ग्रस्त रूग्णांना दिलासा मिळेल.
बडीशेपबडीशेपमध्ये अँटी-इंफ्लेमेट्री घटक असतात. ज्याचा उपयोग पोटा संबंधित समस्या दूर करण्यात होतो. याव्यतिरिक्त, यामध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या रुग्णांना आराम मिळेल. आरोग्य तज्ञांच्या मते, बद्धकोष्ठता आणि इतर पोटात संबंधित समस्या जसं की गॅस आणि ओटीपोटात सूज येणं अशा तक्रारी असणाऱ्यांना बडीशेपचा चहा फायदेशीर ठरतो.