देशात ओमायक्रॉनचा प्रसार पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांचं लसीकरण सुरु करत असल्याची घोषणा केली. ३ जानेवारीपासून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी आता १ जानेवारीपासून CoWin पोर्टलवर लहान मुलांच्या लसीकरणाचं रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. त्यासाठी कशी प्रक्रिया असणार आहे हे जाणून घेऊया.
लहान मुलांच्या लसीकरणाला मंजूरीइतर देशांमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाला अगोदरपासून सुरूवात करण्यात आली आहे. मात्र भारतात ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत असल्याचं लक्षात आल्यावर लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा करण्यात आली आहे.
भारत सरकार तयार
- १ जानेवारीपासून CoWin पोर्टलवर लहान मुलांच्या लसीकरणाची नोंदणी सुरू होणार आहे
- यामध्ये स्टूडेंट आयडेंडिटी कार्ड ओळखपत्र म्हणून जोडलं जाईल.
- ३ जानेवारीपासून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होईल
- सध्या देशातील मुलांना Covaxin दिलं जाईल
Precautionary Dose प्रक्रिया कशी असेल
- सर्व फ्रंटलाइन वर्कर्स आणि कोविड योद्ध्यांनी CoWin वर नोंदणी करणं आवश्यक आहे
- Precautionary Dose घेणाऱ्यांना जुनीच लस देण्यात येईल
- हा डोस देखील मोफत देण्यात येईल
वयस्कर लोकांसाठी लसीकरणाची प्रक्रिया
- नव्या वर्षात सुरु होणार रजिस्ट्रेशन
- पूर्वीसारखीच प्रक्रिया असणार
- तिसरा डोस घेण्यासाठी ९ महिन्यांचं अंतर आवश्यक