Prostate Cancer: कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यातील एक कॅन्सर म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर. पुरूषांना वाढत्या वयात होणारा या कॅन्सरच्या रूग्णांची संख्या अलिकडे दिवसेंदिवस वाढत आहे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, प्रोस्टेट कॅन्सर पुरूषांसाठी एक मोठा धोका बनत चाललला आहे.
आजकालची बिझी लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढतं वय यामुळे प्रोस्टेट कॅन्सरच्या केसेस अधिक वाढत आहेत. हा आजार सामान्यपणे वृद्ध लोकांमध्ये अधिक आढळतो. मात्र, आता तरूणांमध्येही हा आजार दिसून येत आहे. लॅन्सेटमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, पुढच्या २० वर्षांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या केसेसमध्ये मोठी वाढ होऊ शकते. हा रिसर्च पुरूषांसाठी एक चिंतेचा विषय आहे. कारण प्रोस्टेट कॅन्सर पुरूषांमध्ये होणारा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे.
काय सांगतो रिसर्च?
रिसर्चनुसार, येणाऱ्या काही वर्षांमध्ये जगभरात प्रोस्टेट कॅन्सरच्या केसेस वेगाने वाढतील. याचं मुख्य कारण वाढतं वय आणि पुरूषांमध्ये लठ्ठपणा हे कारण आहे. रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, कमी विकसित देशांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या केसेस वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
का वाढत आहे याचा धोका?
- वय वाढण्यासोबत प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढत आहे.
- लठ्ठपणामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.
- जास्त फॅट आणि कमी फायबर असलेल्या आहारामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.
- नियमितपणे व्यायाम न केल्यानेही प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो.
- जर तुमच्या परिवारात कुणाला प्रोस्टेट कॅन्सर झाला असेल तर तुम्हालाही याचा धोका असतो.
प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं
प्रोस्टेट कॅन्सरची सुरूवातीला काहीच लक्षणं दिसत नाहीत. पण जेव्हा कॅन्सर वाढतो तेव्हा याची काही लक्षणं दिसू लागतात.
- पुन्हा पुन्हा लघवी लागणे
- रात्री जास्त वेळ लघवीला जावं लागणे
- लघवी करताना त्रास होणे
- लघवीची धार कमी होणे
- लघवीतून रक्त येणे
- लघवी करताना वेदना होणे
कसा कराल बचाव?
- फळं, हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्याचा आहारात समावेश करावा.
- नियमितपणे हलका व्यायाम करा.
- वजन नियंत्रित ठेवा.
- ५० वयानंतर दरवर्षी प्रोस्टेट कॅन्सरची टेस्ट करा.