अहमदनगर : थंडीचा कडाका आता वाढू लागला आहे. थंडीच्या काळात हृदय आणि शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होऊन आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. थंडीमुळे हृदयाच्या नसा आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे ज्येष्ठांसह विविध विकारांनी त्रस्त व्यक्तींना हृदयविकार आणि लकव्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
रक्तवाहिन्यांचे आकुंचनहिवाळ्यात थंडीमुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते. त्यात हृदयरोग त्रस्त असलेल्या लोकांमध्ये हार्ट रेट वाढण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे दैनंदिन जीवनात काळजी घेण्याची गरज असते.
ज्येष्ठांना सर्वाधिक धोकाथंडीमध्ये रक्ताभिसरण कमी होते आणि त्यामुळे रक्तवाहिन्या गोठतात. त्यामुळेच हृदयरोगाने त्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराची समस्या वाढते. विशेषत्वे ज्येष्ठ नागरिकांची अधिक हालचाल नसल्याने त्यांना धोका अधिक असतो. ही समस्या टाळण्यासाठी शक्य असेल, तेवढा व्यायाम करावा.
काय काळजी घ्याल?१) उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो. तसेच त्यांना ब्रेन हॅमरेजही होऊ शकते.२) थंडीमध्ये गरम कपडे परिधान करण्याला प्राधान्य द्यायला हवे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच आरोग्याची नियमित तपासणी करावी. तसेच थंडीच्या दिवसांत नियमित व्यायाम करावा.
आहाराकडे द्या लक्षतेलकट, तूपकट पदार्थ अधिक प्रमाणात खाऊ नयेत. पौष्टिक खाण्याला प्राधान्य द्यावे. हृदयरोगाने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी बदाम आणि पिस्त्याचे सेवन करणे फायदेशीर असते. व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी फळांचे सेवन करावे.
तज्ज्ञांच्या म्हणण्याकडे लक्ष द्या...जास्त थंडीमुळे शरीरातील रक्त गोठते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. ज्येष्ठांना, तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींना हा धोका अधिक असतो. हृदयासोबतच मेंदूमध्येही रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने हृदयविकाराचा झटका येणे, लकवा होणे असे प्रकार घडू शकतात. शुगर, हाय बीपीच्या रुग्णांनी त्यांची औषधे बंद न करता नियमित घ्यावीत. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य काळजी घेतल्यास धोका टाळता येतो.-डॉ. संदीप गाडे, हृदयरोगतज्ज्ञ, सावेडी, नगर