Raw Garlic Benefits In Winter : लसणाचा वापर भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. लसणाने पदार्थांची टेस्ट तर वाढलेच, सोबतच यातील औषधी गुणांमुळे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. एक्सपर्ट हिवाळ्यात कच्चा लसूण खाण्याची आवर्जून सल्ला देतात. अशात आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात कच्चा लसूण खाऊन तुम्ही कोणत्या समस्या दूर करू शकता हे सांगणार आहोत.
कसं कराल सेवन?
आयुर्वेदानुसार, लसणामध्ये अॅंटीसेप्टीक, अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी व्हायरल आणि अॅंटी इन्फ्लामेटरी गुण असतात. अशात जर तुम्ही हिवाळ्यात नियमितपणे रिकाम्या पोटी लसणाच्या २ कळ्या चावून खाव्यात आणि वरून १ ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यानंतर ३० मिनिटे तुम्हाला काहीच खायचं किंवा प्यायचं नाहीये.
कच्च्या लसणाचे फायदे
शरीराला पोषण
शरीराची शक्ती वाढवण्यासाठी प्रोटीन आणि इतर पोषक तत्व फार गरजेचे असतात. लसणाच्या कळ्यांमध्ये प्रोटीन, कार्ब्स, मॅगनीज, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फायबर असतं. त्यामुळे यातून शरीराला भरपूर शक्ती मिळते.
इम्यूनिटी वाढते
हिवाळ्यात इम्यूनिटी कमजोर झाल्याने वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शनचा धोका असतो. अशात इम्यूनिटी वाढवण्यासाठीही लसूण खाल्ला जाऊ शकतो. एका रिसर्चनुसार, कच्चा लसूण खाल्ल्याने सर्दी-खोकला अशा सामान्य समस्या लगेच दूर होतात. या प्रक्रियेत एका खास लिक्विडमध्ये कळ्या भिजवून ठेवल्याने 20 महिन्यांपर्यंत स्टोर करता येतात.
पुरूषांसाठी फायदेशीर
महिलांच्या तुलनेत पुरूषांना हृदयरोगांचा धोका अधिक राहतो. ज्याचं मोठं कारण म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे. नियमितपणे लसणाचं सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरच्या औषधासारखा प्रभाव बघण्यात आला आहे.
बद्धकोष्ठता होईल दूर
हिवाळ्यात थंडीमुळे भरपूर लोक कमी पाणी पितात आणि यामुळे पोटात गडबड होते. अशात रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने कमजोर झालेलं डायजेस्टिव सिस्टीम बूस्ट होतं. अन्न सहजपणे पचतं आणि बद्धकोष्ठता दूर होते. ज्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांनी लसणाचं सेवन करावं.
स्टॅमिना वाढतो
लसणाचा वापर तुम्ही स्टॅमिना वाढवण्यासाठीही केला जाऊ शकतो. जुन्या काळात ग्रीसमधील खेळाडू या उपायाचा वापर करत होते. जेणेकरून त्यांना थकवा आणि कमजोरी जाणवू नये.
हाडांसाठी फायदेशीर
हाडे कमजोर झाली असतील आणि वेदना होत असेल हा उपाय तुम्ही नक्की करू शकता. अनेक शोधात हे आढळून आलं आहे की, महिला लसणाचं सेवन करून ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियो आर्थरायटिसचा धोका कमी करू शकतात.