शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे 'कच्ची पपई'; तुम्हालाही माहीत असायलाच हवेत हे 5 आश्चर्यकारक फायदे! जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 5:07 PM

...मात्र, गर्भधारणेच्या काळात हिचे सेवन करू नये, असे सांगितले जाते. याशिवाय कच्च्या पपईचे इतरही अनेक फायदे आहेत. तर जाणून घेऊयात काही खास फायदे.

पपई हे फळ चवीबरोबरच आपल्या प्रकृतीसाठीही अत्यंत लाभदायक आहे. साधारणपणे लोक पपई पिकल्यानंतर खातात. पिकलेली पपई पोटासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. मात्र कच्ची पपईदेखील तेवढीच फायद्याची आणि गुणकारी मानली जाते. कच्ची पपई आपली पचनक्रिया चांगली ठेवते. प्रोटीनचे रुपांतर अमीनो अॅसिडमध्ये करते. याशिवाय, कच्ची पपई बद्धकोष्ठता आणि मळमळीपासूनही आराम देते. तसेच, यूरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शनपासून महिलांचे संरक्षण करते. मात्र, गर्भधारणेच्या काळात हिचे सेवन करू नये, असे सांगितले जाते. याशिवाय कच्च्या पपईचे इतरही अनेक फायदे आहेत. तर जाणून घेऊयात काही खास फायदे...

कावीळ -कावीळ, हा एक गंभीर आजार आहे. या आजारात कच्ची पपई अत्यंत फायदेशीर ठरते. या आजारात दर तीन तासांनी अर्धा ग्लास पपईचे ज्यूस प्यायल्यास कावीळमध्ये आराम मिळतो. पपईमध्ये डायजेस्टिव्ह एंझाइम पॅपेन असते, जे एक प्रोटीओलाइटिक एन्झाइम आहे, यापासून औषधेही तयार केली जातात. याची काविळीवर उपचारातही मदत होते.

आतड्याची हालचाल सुधारते -कच्ची पपई ही अँटी पॅरासिटिक आणि अँटी अमेबिक असते. यामुळे, पचनासोबतच आतड्यांच्या हालचालीतही सुधार होतो. आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येतही आराम मिळतो. एवढेच नाही तर, कच्ची पपई, अपचन, अॅसिड रिफ्लक्स, अल्सर, छातीत जळजळ होणे आणि गॅस्ट्रिक समस्यांपासूनही आराम देते.

अस्थमा -पपईची वाळलेली पानं दम्याच्या अटॅकमध्ये अत्यंत उपयुक्त ठरतात. 2022 मधील एका अभ्यासानुसार, पपईमध्ये बीटा कॅरोटीन, लाइकोपीन आणि झेक्सॅन्थिन सारखे ऑरगॅनिक कंपाउंड आढळतात, याच्या सेवनाने दम्याचा अटॅक टाळता येऊ शकतो.

मलेरिया -कच्च्या पपईमधील व्हिटॅमिन ए आणि सी मलेरियाच्या रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. पपईच्या पानांचे सेवन केल्याने मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांचे कमी झालेले प्लेटलेट काउंट वाढण्यास मदत होते. हे मलेरियावरील एक उत्कृष्ट आयुर्वेदिक औषध आहे.

मेंस्ट्रुअल क्रॅम्प्सपासून आराम देते -पपईमध्ये असलेले बीटा कॅरोटीन शरीरातील एस्ट्रोजन हार्मोनच्या कार्यत मदत करते. हे पीरियड्सना नियमित करते आणि या काळात होणाऱ्या वेदनाही कमी करते.

 

(टीप - येथे देण्यात आलेली माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ला नाही. कुठलीही समस्या असेल तर नेहमीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्यायला हवे.) 

टॅग्स :Healthआरोग्यLifestyleलाइफस्टाइल