(Image Credit : The Independent)
वाढत्या वयासोबत शरीराच्या अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. जसजसं शरीर थकतं तसतशा शरीराच्या समस्या वाढत जातात. अशातच वाढत्या वयानुसार, अनेकांना सांधेदुखी (आर्थराइटिस)चाही सामना करावा लागतो. सांधेदुखीमुळे फक्त भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील लोक त्रस्त आहेत. जसंजसं या रोगाची लक्षणं वाढत जातात, तसतसं या रोगाने ग्रस्त असणाऱ्या लोकांना चालणं-फिरणंही नकोसं होतं. सांधेदुखीचा सर्वात जास्त परिणाम गडघे आणि मणक्यावर होतो. त्याचबरोबर हाताची बोटं, मनगट तसेच पाय यांसारख्या सांध्यांवरही याचा परिणाम दिसून येतो. भारतामध्ये प्रत्येक दुसरी किंवा तिसरी व्यक्ती गुडघेदुखीमुळे त्रस्त आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, देशामध्ये जवळपास 15 कोटींपेक्षा अधिक लोक गुडघेदुखीमुळे त्रस्त आहेत. ज्या वेगाने हा आजार वाढत आहे. त्यानुसार येणाऱ्या काही वर्षांमध्ये आर्थरायटिस लोकांना शारीरिकरित्या असक्षम बनवण्याचं कारण ठरू शकतं. भारतीय लोक आनुवांशिकरित्या गुडघ्यांच्या आर्थरायटिसने ग्रस्त आहेत. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये जवळपास 6.5 कोटी लोक गुडघेदुखीने त्रस्त आहेत. यातुलनेत भारतामध्य गुडघेदुखीने त्रस्त असणाऱ्यांची संख्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे.
कच्चा बटाटा खाण्याचे फायदे :
बटाटा प्रत्येक स्वयंपाकघरात आढळून येतो. कारण बटाट्यापासून अनेक चवीष्ट पदार्थ तयार करण्यात येतात. याव्यतिरिक्त सर्वात खास गोष्ट म्हणजे, सांधेदुखीमध्ये बटाटा सर्वात गुणकारी ठरतो. तुम्हाला माहीत आहे का? कच्च्या बटाट्याचा रस सांधेदुखीवर उपचार म्हणून अत्यंत फायदेशीर ठरतो. कच्च्या बटाट्याच्या रसामध्ये अॅन्टीइफ्लेमटरी गुण असतात. त्यामुळे हे मान, खांदे, कोपर आणि गुडघे यांसारख्या सांध्यांवर गुणकारी ठरतात. कच्च्या बटाट्याचा रस प्यायल्याने लोकांना फायदा होतो. बराच वेळ आर्थरायटिसच्या त्रासने वैतागला असाल तर कच्च्या बटाट्याच्या रस काडण्याआधी सालीसकट त्याचे बारिक तुकडे करा. त्यानंतर बटाट्याचे तुकडे पाण्यामध्ये रात्रभर तसेच ठेवून द्या. सकाळी अनोशापोटी हे पाणी प्या. यामुळे शरीराला इतर फायद्यांसोबतच सांधेदुखी दूर करण्यासाठीही फायदा होतो.
यांचही सेवनही फायदेशीर :
1. भाज्यांचा ज्यूस2. तीळ3. लसूण4. केळी5. मूगाच्या डाळीचं सूप
काय असतं सांधेदुखी?
जेव्हा शरीरातील हाडांच्या सांध्यांमध्ये यूरिक अॅसिड जमा होतं, त्यावेळी त्याचं रूपांतर सांधेदुखीमध्ये होतं. यामुळे अनेकजण एक किंवा अधिक सांध्यांमध्ये वेदना होणं, सूज येणं यांसारख्या समस्यांनी त्रस्त होतात. सांधेदुखीचा त्रास वाढला तर व्यक्तीला चालतानाही त्रास होतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. कारण प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.