(Image Cedit :Wellthy Therapeutics)
सध्या दीक्षित डाएट आणि ऋजुता डाएट यांसारख्या प्रसिद्ध डायटीशियनच्या डाएट प्लॅनबाबत अनेक चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. अनेकदा तर कोणचा डाएट प्लॅन फॉलो करावा याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. अशातच या आंब्याच्या सीझनमध्ये सेलिब्रिटी डायटीशियन ऋजुता दिवेकर यांनी मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्यांसाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत.
उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते फळांच्या राजाच्या आगमनाचे. आंब्याचं नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं. सध्या आंब्याचा सीझन सुरू असून बाजारातही ठिकठिकाणी आंबे दिसून येत आहे. इतकेच नाही तर घराघरातही आंब्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. तसेच आंबा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. अशातच डायबिटीजने ग्रस्त असणाऱ्या लोकांच्या मनात एकच प्रश्न येतो, तो म्हणजे त्यांनी आंबा खाणं योग्य आहे की नाही? अनेकदा अशा व्यक्तींना पडलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर न मिळाल्यामुळे आंबा खाणं टाळतात. पण आता चिंता करू नका. तुम्हीही डायबिटीक असाल आणि तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल तर, सेलिब्रिटी डाएटीशियन ऋजुता दिवेकर यांचा व्हीडिओ तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर समजुन घेण्यासाठी मदत करेल. जाणून घेऊया की, खरचं डायबिटीजच्या रूग्णांनी आंबे खाणं फायदेशीर ठरतं का?
अत्यंत फायदेशीर ठरतो आंबा
सध्याचं सीझन आंब्याचं आहे. इतर फळांच्या तुलनेत आंब्याला विशेष महत्त्व आहे, तसेच जगभरामध्येही आंब्याचे अनेक फॅन्स आहेत. भारतामध्ये मुख्यकरून 12 आंब्याच्या जाती आढळून येतात. आंब्याचा वापर फक्त फळ म्हणून नाही तर, भाजी, चटनी, कैरीचं पन्हं, ज्यूस, कँडी, लोणची, शेक, आंबा पोळी आणि इतर पदार्थांची चव वाढविण्यासाठी करण्यात येतो. एवढे गुणधर्मांनीयुक्त असलेला आंबा खाण्यापासून फक्त डायबिटीजमुळे लोकांना दूर ठेवण्यात येत असेल तर त्यांनी निराश होणं स्वाभाविकच आहे. पण आता जास्त निराश होऊ नका. जाणून घेऊया ऋजुता दिवेकर यांचं काय आहे मत?
काय आहे एक्सपर्ट अॅडव्हाइज?
आंबा आणि डायबिटीजबाबत बोलायचे झाले तर डायटीशियन ऋजुता दिवेकर सांगतात की, आपण दररोज जे बिस्किट्स खातो, ते आंबा खाण्यापेक्षा जास्त नुकसान पोहोचवणारे असतात. आपण हे पदार्थ खात असू आणि फळं खाणं टाळत असू तर ते आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायी असतं. त्यामुळे ऋजुता दिवेकर सांगतात की, प्रोसेस्ड फूडमध्ये जास्त शुगर लेव्हल असते. परंतु झाडावर येणाऱ्या नॅचरल फळांमध्ये शुगर लेव्हल नियत्रिंत करणारे गुणधर्म असतात.