प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. असेही पाहिले जाते की, अनेक महिलांना पोटावर झोपण्याची सवय असते. पण अशाप्रकारे झोपणे आरोग्यासाठी चांगलं नसतं. याने वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. पोटावर झोपण्याने अनेकप्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला ही सवय असेल तर वेळीच बदला.
काय होतात समस्या?
डोकेदुखी - जे लोक पोटावर झोपतात, त्यांना नेहमीच डोकेदुखीची समस्या भेडसावत असते. होतं असं की, या पोजीशनमध्ये झोपल्याने मान वाकडी होते आणि डोक्यापर्यंत योग्यप्रकारे रक्त पुरवठा होत नाही. यामुळे नेहमी डोकेदुखी किंवा डोकं जड वाटणे या समस्या होतात.
पिंपल्स - पोटावर झोपल्याने आपल्या शरीराला योग्युप्रकारे ऑक्सिजन मिळत नाही. तसेच बेडमधील बॅक्टेरियाही चेहऱ्याच्या संपर्कात येतात. याने चेहऱ्यावर पिंपल्स तसेच डाग येण्याची समस्या निर्माण होते.
पोटदुखी - पोटावर झोपल्याने पोटावर भार पडतो आणि यामुळे योग्यप्रकारे पचनक्रिया होत नाही. याने पोटदुखीची समस्या होऊ शकते. तसेच पोटासंबंधी आणखीही काही वेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
हाडे आणि पाठदुखी - पोटावर झोपल्याने शरीराची पोजीशन योग्य राहत नाही. या कारणाने हाडांमध्ये वेदना होण्याची शक्यता असते. पोटावर झोपताना पाठीचा कणा ताठ राहत नाही. या कारणाने पाठीत दुखणं होतं. सतत असे झोपत असाल तर पाठदुखीची समस्या इतकी वाढू शकते की, तुम्हाला सरळ बसणेही कठीण होईल.