नेहमीच आपण आई-वडील, मित्रांकडून किंवा बॉसकडून तुम्ही सतत मोबाईलला चिकटून राहण्याची तक्रार ऐकली असेल. यासाठी अनेकजण सोशल मीडियाला जबाबदार धरतात. पण नुकत्यात करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, यासाठी मोबाईल गेम्स जास्त जबाबदार आहेत.
आयरलॅंडमधील कॉर्कच्या अभ्यासकांनुसार, भारताचा त्या देशांमध्ये समावेश होतो ज्या देशातील लोक मोबाईल फोनवर स्पोर्ट्स आणि रेसिंग गेम्स सर्वात जास्त डाऊनलोड करण्यात पुढे आहेत. या अभ्यासात इंग्रजी भाषेचा वापर करणाऱ्यांना सहभागी करुन घेण्यात आले होते.
या अभ्यासात अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंडसोबतच जपान आणि दक्षिण कोरिया या देशांना सहभागी करुन घेण्यात आले होते. या देशांमध्ये अॅप्सचा सर्वाधिक वापर होतो. अभ्यासकांचं मत आहे की, असे असण्याचे कारण म्हणजे जास्तीत जास्त अॅप्सचं इंग्रजी व्हर्जन उपलब्ध आहे.
याउलट इंग्रजी भाषा नसलेल्या देशांमध्ये दुसऱ्या अॅप्सचा अधिक वापर होतो. अशा देशांमध्ये गेमिंग अॅप्सची मागणी सर्वात जास्त असते. या यादीत चीन, भारत, अर्जेंटिना, संयुक्त अरब अमिरात, कतार, सौदी अरब, पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. या अभ्यासानुसार, अॅप्सचा वापरात भूगोलाचं महत्त्व अधिक असतं. त्यासोबतच सामाजिक-आर्थिक गोष्टींचाही अॅप्सच्या वापरावर प्रभाव पडतो.
जपानमध्ये अॅप्सचा अधिक वापर होतो. तर रशियासारख्या समूहवादी सभ्यतेमध्ये परिवार, गुण आणि शिक्षणासंबंधी अॅप्सचा वापर सर्वात जास्त केला जातो. दुसरीकडे अमेरिकेसारख्या व्यक्तिवादी समाजात मनोरंजनाशी निगडीत अॅप्सचा अधिक वापर होतो. या अभ्यासाच्या अभ्यासक एला पेल्टोनन म्हणाल्या की, 'आमच्या शोधातून हे स्पष्ट झालं आहे की, तुम्ही तुमच्या फोनमध्ये ज्या अॅप्सचा वापर करता, त्यावर तुमच्या भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा प्रभाव असतो'.