बऱ्याचदा असं होतं की, गाणं वाजू लागलं की आपले पाय थिरकण्यास सुरुवात होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? असं का होत असावं. याबाबत अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, त्यांना गाणं ऐकल्यानंतर आनंद होतो म्हणून त्यांचे पाय अचानक थिरकू लागतात. परंतु, याबाबत आणखी एक खुलासा झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये याबाबत एक संशोधन झालं असून काही दिवसांपूर्वीच याचे परिणाम समोर आले आहेत.
म्युझिकचा बेस संशोधकांना असं आढळलं की, म्युझिकवर किंवा गाण्यावर पायांचं थिरकनं हे त्या गाण्याच्या बेस(BASS) वर अवलंबून असतं. संशोधनादरम्यान, कमी आणि जास्त आवाजाच्या फ्रीक्वेंसी आणि हाय फ्रीक्वेंसी साउंडमुळे मेंदूवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. याच आवाजाने आणि फ्रिक्वेंसीमुळे म्युझिकचा रिदम तयार होतो.
म्युझिकचा बेस जास्त असेल तरच पाय थिरकू लागतात
मेंदूचे कार्य समजण्यासाठी लेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी नावाच्या तंत्राचा वापर करण्यात येतो. रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, एखादं गाणं सुरू असेल तर त्यावेळी मेंदूच कार्य त्या गाण्यावर अवलंबून असतं. जर त्या गाण्याचा बेस जास्त असेल तर आपोआप मेंदूला चालना मिळते आणि आपले पाय थिरकू लागतात. पण तेच जर बेस कमी असेल तर नाचण्याची इच्छा होत नाही.
म्युझिक थेरपीचा वापर करून करण्यात येतात उपचार
संशोधकांना अशी आशा आहे की, त्यांनी केलेलं संशोधन अनेक प्रकारच्या मेडिकल कंडिशन समजून घेण्यासाठी आणि त्यांवर उपचार करण्यासाठी वापरता येऊ शकते. सध्या म्युझिक थेरपीचा वापर करून अनेक उपचार करण्यात येतात. येणाऱ्या काळात म्युझिकचा वापर फक्त मनालाच आराम देण्यासाठी नाहीतर उपचारांसाठीही करण्यात येणार आहे.