आपल्यापैकी अनेकांना पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशातच चारचौघांत शरमेने मान खाली घालवायला भाग पाडणारे हे पांढरे केस काळे करण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या हेअर डाय प्रोडक्ट्सचा आधार घेतो. अनेकदा तर आपल्या सिम्पल केसांना नवीन लूक देण्यासाठी नवीन कलर करण्याचा प्लॅन करण्यात येतो. तुम्हीही असाच केसांना कलर करण्याचा प्लॅन करत असाल तर, मासिक पाळी येण्याआधी केसांना डाय किंवा कलर करू नका. असं आम्ही नाही तर हेअर कलर एक्सपर्ट्स सांगत आहेत की, मासिक पाळी येण्याआधी केसांना ब्लीच करणं टाळावं. कारण असं केल्याने तुमच्या स्काल्पला म्हणजेच, डोक्याच्या त्वचेला वेदना किंवा इजा होण्याचा धोका असतो.
मासिक पाळीआधी स्काल्प सेन्सिटिव्ह होतात
तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळी येण्याआधी स्काल्प इतर दिवसांच्या तुलनेमध्ये अधिक सेन्सिटिव्ह होतात. अशातच जर या दिवसांमध्ये केसांना कलर केला गेला तर, स्काल्पना वेदना होतात. याबाबत जर तुम्ही कोणत्याही हेअर एक्सपर्टसोबत बोलाल तेव्हा ते तुम्हाला हेच सांगतील की, मासिक पाळीच्या दिवसांमध्ये केसांना कलर किंवा डाय करण्यासोबतच कोणत्याही ब्युटी ट्रिटमेंट करणं टाळावं.
स्काल्पना वेदना आणि इरिटेशन होऊ लागतं
मासिक पाळीआधी किंवा मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही तुमचे केस डाय करत असाल, तेव्हा तुम्हाला स्काल्पमध्ये इरिटेशन जाणवू लागेल. यूनिवर्सिटी ऑफ मिशिगनमधील एका टिमने 2003मध्ये एक संशोधन केलं होतं, ज्यामध्ये असं आढळून आलं की, महिलांमध्ये एस्ट्रोजेन लेव्हल बदलते. तेव्हा त्यांना मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान वेदना आणि सेन्सिटिव्हीटी जाणवते.
ब्रेन नॅचरल पेनकिलर इन्डॉर्फिन रिलीज नाही करत...
संशोधनानुसार, शरीरामध्ये एस्ट्रोजनची उच्च पातळी मेंदूला संकेत देते की, नॅचरल पेनकिलर सिस्टममार्फत इन्डॉर्फिनला रिलीज करा जे वेदना कमी करण्यासाठी मदत करतं. दरम्यान, एस्ट्रोजनच्या लो लेवलमुळे मेंदूची नॅचरल पेनकिलर सिस्टम काम करत नाही आणि वेदनांप्रति सेन्सिटिव्ह होतात.
त्यामुळे सावधनता बाळगणं फायदेशीर
दरम्यान, सर्व महिलांना मासिक पाळी दरम्यान सारखाच अनुभव येत नाही. या विषयावर आणखी खोलवर रिसर्च करण्याची गरज आहे. परंतु एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, जर आपण सावधगिरी बाळगली तर आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.