शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

मासिक पाळीच्यावेळी पोटदुखीचा त्रास होतो? जाणून घ्या कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 10:01 AM

प्रत्येक महिलेला महिन्याचे काही ४ ते ५ दिवस  प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात.

प्रत्येक महिलेला महिन्याचे काही ४ ते ५ दिवस  प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. अशक्तपणा, पोटदुखी, कंबरदुखी आणि अवयवांना सूज सुद्धा येते. तसंच काहीजणांना पोटात दुखायचा त्रास इतका होत असतो, की वेदनेमुळे त्या  स्त्रिया घराबाहेर सुद्धा पडू शकत नाही. त्यामुळे सुट्टी घेऊन घरी आराम करण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. अशा  समस्येपासून आराम मिळवण्यासाठी जर पेनकिलर घेतली तर  त्याचा  नकारात्मक परिणाम सुद्दा होऊ शकतो. त्यातल्या त्यात कधी पाळीवेळेवर  येते तर कधी येत नाही. अशावेळी पाळी येईपर्यंत पोटाच्या समस्या जाणवतात. 

सर्वाधिक महिलांना मासिक पाळी दरम्यान  पोटात गॅस होण्याची समस्या जाणवते. पण यात वेगळे वाटण्यासारखे काहीत नाही अनेक महिलांना या समस्येला सामोरं जावं  लागतं. जर तुम्ही विचार करत असाल की मासिक पाळीच्यावेळी वेदना का होतात. तर आज आम्ही तुम्हाला या वेदनेमागचं कारण सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया ही समस्या का उद्भवते. 

(image credit- medicalnewstoday)

हार्मोनल बदल

मासिक पाळी येण्याच्या आधी इस्टोजनच्या हार्मोन्सची सुरूवात आोव्यूलेशनपर्यंत होत असते. मासीक पाळीच्या दरम्यान हार्मोन्स मध्ये झालेला बदल तुमच्या वर्तनावर प्रभाव टाकत असतो. त्यांचा परिणाम गैस्ट्रोइन्टेस्टनल सिस्टमवर पडत असतं. पचनसंस्थेवर या हार्मोन्सच्या बदलांचा परिणाम होत असतो. त्यामुळे गॅस होणे किंवा जुलाब होणे या  समस्या उद्भवत असतात.

अ‍ॅसिड

(image credit healthline)

अ‍ॅसिडमुळे सुद्धा मासीक पाळीच्या समस्या उद्भवतात. कारण त्यावेळी गर्भाशयाच्या आतल्या भागातून एका विशिष्ट प्रकारचं अ‍सिड रिलीज होत असतं. याचं नाव प्रोस्टाग्लँडिन असं आहे.  त्यामुळे  रक्तस्त्राव होण्यास मदत होते. त्याचा परिणाम मासपेशींवर होत असतो. तसंच पचनक्रियेवर सुद्धा  याचा परिणाम होत असतो. त्यामुळे अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवते.

(image credit- healthline.com)

या वेदनेपासून बचाव करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी भरपूर पाणी प्या. गॅस होण्यापासून बचाव करायचा असल्यास पुरेसा व्यायाम करा. कमी आणि पचण्यास हलके अन्न खा.  कोल्ड्रींक किंवा कॅफिनचं  सेवन करणं टाळा. पाळीदरम्यान हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्रास होतो. त्यावर जिरे-गूळ याचं पाणी हा उत्तम उपाय आहे.

मासिक पाळी सुरू असताना आरामदायक कपडे वापरा. घट्ट कपडे वापरल्यामुळे तुमचा त्रास अधिकच वाढू शकतो. झोपण्यापूर्वी पोट आणि कंबरेवर कोमट तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घ्या. मासिक पाळी सुरू असताना सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्याने अंघोळ करा. ज्यामुळे तुमच्या स्नायूंना आराम मिळेल. पोटावर हिंगाचे पाणी लावल्याने देखील तुम्हाला बरं वाटू शकतं. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स