(Image Credit: resveralife.com)
अनेकजण चांगल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या फळांचं सेवन करतात. थेट फळं खाण्याऐवजी फळांचा ज्यूस सेवन करण्यावर अनेकांचा भर असतो. पण फळांचा ज्यूस पिण्याचे फायदेही आहेत तर काही तोटेही आहेत. त्यामुळे कमी प्रमाणात ज्यूस पिणे अधिक योग्य ठरतं. चला जाणून घेऊया काय आहेत अधिक प्रमाणात ज्यूस पिण्याचे तोटे.....
यामुळे कमी प्यावा ज्यूस
काही अशी फळे आहेत जसेही सफरचंद आणि द्राक्ष जे डायबिटीजसाठी फायदेशीर मानले जातात. पण याच फळांचा ज्यूस करुन प्यायलास त्याचा विपरीत प्रभाव होऊ शकतो. कारण ज्यूसमध्ये कॅलरीचं प्रमाण अधिक असतं. सोबतच त्यात कॉन्सनट्रेटिड शुगरही अधिक असते. ज्यूसमध्ये फायबर कमी असतं, ज्याकारणाने ज्यूस प्यायल्यावर लगेच तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं.
ज्यूस ऐवजी फळ खावे
एका फळाच्या तुलनेत ज्यूस जास्त प्रमाणात सेवन केला जातो. त्यामुळे त्याने कार्बोहायड्रेट इन्टेकही जास्त होतं. एका अभ्यासात समोर आलं आहे की, ज्या लोकांनी जेवण करण्याआधी सफरचंदाचा ज्यूस घेतला त्यांनी जास्त भूक लागली आणि त्यांनी त्या लोकांच्या तुलनेत अधिक आहार घेतला ज्यांनी एक सफरचंद खाल्यावर जेवण केलं.
ज्यूस नसावा डाएटचा भाग
ज्यूस आपल्या डेली लाइफचा भाग असणे योग्य नाहीये. पण अनेकजण आरोग्य चांगलं राहतं म्हणून आपल्या डेली डाएटमध्ये याचा समावेश करतात.
ज्यूस आणि जाडेपणाचं कनेक्शन
ज्यूस पिण्याऐवजी खाण्याची सवय असायला हवी. अनेकांना माहीत नसेल पण ज्यूस पिण्याचा थेट संबंध जाडेपणाशी आहे. काही लोक याच्या फायद्यामुळे याकडे दुर्लक्ष करतात. जाडेपणासोबतच ज्यूस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते.
या समस्याही होतात
ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल प्रभावित होतो. त्यासोबतच डोकेदुखी, मूड स्विंग्ससारख्या समस्याही होतात. त्यामुळे ज्यूसचं सेवन योग्य प्रमाणातच असावं.