Baasi Roti Benefits: अनेकदा असं होतं की, रात्री बनवलेल्या काही चपात्या शिल्लक राहतात. अनेकजण या चपात्या गायींना किंवा कुत्र्यांना खाऊ घालतात. असेही काही असतात जे त्या चपात्या कचऱ्यात फेकतात. तर काही लोक सकाळी नाश्त्यात या चपात्या खातात.
अनेकांना हे माहीत नसेल की, शिल्लक राहिलेल्या चपात्या खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. ज्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. असं मानलं जातं की, शिळी चपाती सकाळी खाल्ल्याने अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. या चपात्या असं काम करतात जी महागडी औषधंही करू शकत नाहीत. चला जाणून घेऊ शिळी चपाती खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे...
हाय ब्लड प्रेशर कमी होतं
सकाळी रात्रीची शिल्लक राहिलेली चपाती थंड दुधात कुस्करून खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. एका न्यूट्रिशनिस्ट्सने सांगितलं की, सकाळी थंड दूध प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं. काही लोक शिळी चपाती भाजीसोबतही खाऊ शकतात.
डायबिटीसचा रामबाण उपाय
हाय ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी औषधांसोबतच लाइफस्टाईलमध्ये बदल करणं गरजेचं आहे. अशा रूग्णांनी रात्रीची शिळी चपाती खाल्ल्यास त्यांना फायदा मिळू शकतो. न्यूट्रिशनिस्ट्स सांगतात की, डायबिटीक रूग्णांनी रिकाम्या पोटी दुधासोबत याचं सेवन करावं.
वजन कमी करण्यास मदत
शिळ्या चपातीमध्ये डायटरी फायबर असतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात. कारण अशा फायबरमुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं आणि भूक जास्त लागत नाही. अशात लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना शिळी चपाती खाणं जास्त फायदेशीर ठरू शकतं.
हेल्दी बॅक्टेरिया
आपल्या गटमध्ये म्हणजे आतड्यांमध्ये हेल्दी बॅक्टेरियांची संख्या कमी होऊ नये. कारण हे डायजेशनसाठी फार महत्वाचे असतात. शिळ्या चपातीमुळे ते वाढतात. ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि पोट खराब होण्याची समस्या होत नाही.
शिळ्या चपातीचा सकाळच्या नाश्त्यामध्ये समावेश करावा. याने तुमचा वेळही वाचतो आणि आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. ही चपाती खाऊन तुमचा थकवा आणि कमजोरीही दूर होते.