( image credit-www.express.co.uk)
जगातल्या प्रत्येक घरात मोठ्या आवाजात घोरणारा व्यक्ती असतो. त्या एका व्यक्तीमुळे संपूर्ण आजुबाजूला झोपलेल्या लोकांची झोप उडत असते. पुरूषांसोबतच महिला सुद्धा घोरण्याच्या बाबतीत पुढे असतात. काही लोकं रोज घोरतात. तर काही लोकं जास्त थकवा आला असेल त्या दिवशी झोपेत घोरत असातात. काही लोकांची घोरण्याची पध्दत इतकी विचित्र असते की ते घोरल्यानंतर एखाद्या वाघाने डरकाळी फोडल्यासारखे लोकं दचकतात.
(Image credit- dentralsurgury.uk)
झोपताना एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जे वाईब्रेशनस क्रियेट होत असतात. त्यांना घोरणे असं म्हणतात. सगळीकडे घोरण्याची पद्धत गमतीत घेतली जाते. पण तुम्हाला हे माहीत आहे की जास्त घोरण्याची सवय मोठ्या आजाराचं लक्षण सुद्धा असू शकतं.
लोक का घोरतात
एका रिसर्च रिपोर्टनुसार घोरण्याची अनेक कारणं असू शकतात. एनाटॉमिकल स्टॅंडपॉइंट नुसार नाक आणि गळा उगडा असल्यामुळे घोरण्याची क्रिया होत असते. झोपेत असताना आपल्या मानेच्या मासपेशी रिलॅक्स होत असतात. कधीकधी इतक्या रिलॅक्स होत असतात की एअरवे काही प्रमाणात बंद होतो. त्यामुळे हवा बाहेर जाण्यासाठी असेलली नलिका आकुंचन पावते. ज्यावेळी शरीराला पर्याप्त ऑक्सिजन मिळत नाही त्यावेळी मेंदूद्वारे शरीराला संदेश दिला जातो. यामुळे अनेकदा आपली झोप मोड होते. या रिपोर्ट नुसार ४० टक्के प्रौढ लोकं घोरत असतात. ज्या लोकांचे टॉन्सिल्स आणि जीभ मोठी असते. किंवा ज्या लोकांच्या मानेच्या आजुबाजूला जास्त वजन असतं अशी लोकं जास्त घोरतात. नाक आणि जॉ लाईनच्या आकारावर घोरण्याचा परिणाम होत असतो. जर तुम्हाला आपल्या घोरण्याच्या सवयीतून सुटका मिळवायची असेल तर या उपायांचा वापर करणं गरजेचं आहे.
जर तुमचं वजन जास्त असेल तर व्यायाम करणं गरजेचं आहे
सरळ झोपण्यापेक्षा डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा.
झोपण्याआधी मद्याचं सेवन करू नका.
धुम्रपान बंद करा.
राईच्या तेलाचा आहारात समावेश करा.
आलं आणि मधाच्या चहाचे सेवन करा.