लघवी केल्यानंतर नेहमीच घाणेरडा वास येत असतो. त्यापासून वाचण्यासाठी नेहमीच जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण पाण्याचे सेवन जास्त केल्यामुळे लघवी केल्यानंतर दुर्गंध येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही आजारांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला कळेल की लघवीचा वास जास्त येत असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार असण्याची शक्यता असते. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ मुत्र आणि घामाद्वारे बाहेर पडत असतात. तर मग जाणून घ्या लघवीच्या दुर्गंधीमुळे कोणते आजार होतात.
युटीआईमुळे
युरिनरी ट्रॅक इन्फेक्शिन एक असा आजार आहे. ज्यामुळे महिलांच्या लघवीतून वास येत असतो. युटीआई हे असं इन्फेक्शन आहे. ज्यात महिलांची गर्भपिशवी खराब होत असते. तसंच आग सुद्धा होत असते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडू शकतं. म्हणून त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणं गरजेचं आहे.
शरीरात डिहाइड्रेशन झाल्यामुळे
शरीराच्या हाडांसह सगळ्याच भागांना पाण्याची खूप गरज असते. आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवणं फार गरजेचं असतं. त्यासाठी १० ते १२ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. गरजेपेक्षा कमी पाण्याचे सेवन केल्यानंतर आरोग्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे लघवीचा घाणेरडा वास येण्याबरोबरचं रंग सुद्धा पिवळा होत असतो. पोट साफ होण्यास सुद्धा समस्या निर्माण होत असतात.
आहारातील चुकीच्या पदार्थाचा समावेश
आपल्या आहारात काही पदार्थ असे असतात. ज्यामुळे लघवीतून वास येत असतो. जास्त मसालेदार पदार्थ लसूण आणि कांदा खाल्यामुळे लघवीचा वास येतो. मद्याचे अतिसेवन आणि धुम्रपान केल्यामुळे लघवीचा वास येत असतो.
डायबिटीज
मुत्राचा जास्त वास येत असेल तर डायबिटीस सुद्धा असू शकतो. डायबिटीस हा असा आजार आहे. जो मरेपर्यंत सोबत राहत असतो. रक्तात साखरेचे प्रमाण अधिक झाल्यामुळे हा आजार होतो. या आजारात लघवीचा घाणेरडा वास येतो. गरोदरपणात सुरूवातीच्या काही दिवसात मुत्राचा खूपच घाणेरडा वास येत असतो. ( हे पण वाचा-सावधान! हृदयाचे ठोके थांबवू शकतं नसांमध्ये जमा असलेलं कॉलेस्ट्रॉल, जाणून घ्या उपाय)
एसटीडी
जर लघवीचा वास जास्तच येत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. वजायनल इन्फेक्शन किंवा त्याहीपेक्षा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार घ्या. ( हे पण वाचा-३ दिवसात लिव्हर डीटॉक्स करेल मनुक्याचं हे खास पाणी, फायदे वाचून व्हाल अवाक्...)