शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

लसूण आणि कांदा खाल्ल्याने मलाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 9:33 AM

वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासोबतच कांदा आणि लसूण वेगवेगळ्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठीही फायदेशीर ठरतात.

कांदा आणि लसणाचे वेगवेगळे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत असतील. वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासोबतच कांदा आणि लसूण वेगवेगळ्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. आता कांदा आणि लसणाचा आणखी एक मोठा फायदा समोर आला आहे. जर तुम्ही डाएटमध्ये पालीचा कांदा, कांदा आणि लसणाचा समावेश रत असाल तर तुमच्यात कोलोरेक्टल कॅन्सर (colorectal cancer) म्हणजेच मलाशयाचा कर्करोग विकसित होण्याचा धोका कमी राहतो. 

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला आहे. कोलोरेक्टल कर्करोग हा मलाशय आणि गुदद्वाराचा कर्करोग आहे. मलाशय आणि गुदद्वार हे मोठ्या आतड्यांचा भाग आहेत. जो पचन तंत्राचा सर्वात खालचा भाग असतो. ज्या वेगवेगळ्या कॅन्सरमुळे लोकांचा मृत्यू होतो, त्यात महिला आणि पुरूषांच्या प्रकरणात कर्करोगाचं हे क्रमश: दुसरं आणि तिसरं सर्वात मोठं रूप आहे. 

एशिया पॅसिफिक जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये आढळले की, कांदा, लसूण आणि कांद्याची पाल खाल्ल्याने वयस्कांमध्ये कोलरेक्टल कर्करोगाचा धोका ७९ टक्के कमी होतो. चायना मेडिकल यूनिव्हर्सिटीच्या फर्स्ट हॉस्पिटलचे झी ली म्हणाले की, आमच्या रिसर्चमधून जे निष्कर्ष समोर आले आहेत, त्यानुसार हे सांगणं चांगलं होईल की, काळजी घेण्यासाठी कांदा आणि लसूण असलेल्या भाज्या खाणे जास्त फायदेशीर आहे. 

ते म्हणाले की, या रिसर्चचे निष्कर्ष यावरही प्रकाश टाकतात की, जीवनशैलीमध्ये परिवर्तन करून कशाप्रकारे सुरूवातीलाच कोलोरेक्टल कर्करोगाला रोखलं जाऊ शकतं. या रिसर्चमध्ये ८३३ निरोगी  आणि कोलोरेक्टल कर्करोगाने पीडित ८३३ रुग्णांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांच्यावर परिक्षण करून हा निष्कर्ष काढला गेला की, कांदा, लसूण आणि पालीचा कांदा खाल्ल्याने मलाशयाच्या कर्करोगापासून बचाव केला जाऊ शकतो. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcancerकर्करोग