कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने संपूर्ण जगभरात हाहाकार पसरवला आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आतापर्यंत करोडो लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. जे लोक आधीपासूनच या व्हायरसनं संक्रमित आहेत. त्यांना कोरोना व्हायरस पुन्हा संक्रमित करू शकतो, अशी नवीन माहिती समोर येत आहे. जे लोक या व्हायरसनं संक्रमित झाले आहेत. त्यांच्या शरीरात व्हायरसशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो. पण कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या स्ट्रेनबाबत हे संभव आहे की नाही याचे उत्तर आता सापडलं आहे. असा दावा दक्षिण आफ्रकेतील राष्ट्रीय संक्रामक आरोग्य संस्थानाच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
वैज्ञानिकांना या रिसर्चमध्ये दिसून आलं की, कोरोना संक्रमणाचा सामना केलेल्या लोकांना पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो. कोरोना संक्रमणानंतर शरीरात ज्या एंटीबॉडी तयार होतात. त्या ५ ते ६ महिने सक्रिय राहतात. यादरम्यान कोरोना व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यानंतर एंटीबॉडीमध्ये उपस्थित प्रोटीन्स बांधून ठेवतात. त्यामुळे शरीरात कोरोना विषाणू पसरू शकत नाही.
'या' समस्यांवर रामबाण उपाय धण्याचे पाणी; रात्री भिजवून सकाळी प्याल तर आजारांपासून राहाल लांब
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमध्ये असं काहीही होत नाही. कोरोनाचा नवीन स्ट्रेन शरीरात उपस्थित असलेल्या एंटीबॉडीच्या प्रोटीन्समधील स्पाईक न्यूट्रीलायजर्समध्ये प्रतिरोधी क्षमता विकसित करतात. त्यानंतर एँटीबॉडीजवर परिणाम होतो. याच कारणामुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बरं झाल्यानंतरही लोक दुसऱ्या स्ट्रेनने संक्रमित होऊ शकतात.
वैज्ञानिकांनी यावर एक रिसर्च केला होता. त्यानुसार अर्ध्या लोकांच्या रक्तांच्या नमुन्यांमध्ये दिसून आले की, शरीरातील एंटीबॉडी नवीन स्ट्रेनशी लढण्यासाठी हवी असलेली क्षमता गमावतात. त्यामुळेच पुन्हा संक्रमित होण्यापासून वाचवलं जाऊ शकत नाही. या चाचणीत सहभागी असलेल्या लोकांच्या रक्तात एंटीबॉडीजचा स्तर कमी झाल्याचे दिसून आले.
मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना आधी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी सार्वजनिक उपयांचा अवलंब करायला हवा. मास्कचा वापर, नियमित हात धुणं, सॅनिटायजिंग करायला हवं. साफ, सफाईकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तरच कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करता येऊ शकतो.