दुर्गंधी हा बर्याच लोकांसाठी अत्यंत अप्रिय अनुभव असू शकतो. अनेकदा असे घडते की तुम्हाला श्वासाची दुर्गंधी येते आणि तुम्हाला ते कळतही नाही. अशा परिस्थितीत लोक हळूहळू तुमच्यापासून दुरावू लागतात. जर कोणी तुमच्या समस्येबद्दल उघड-पणे बोलले तर तुम्हाला ते खूप लाजिरवाणे वाटू शकते. त्यामुळे काही घरगुती उपायांनी तुम्ही तोंडाची दुर्गंधी घालवू शकता. मात्र हे उपायदेखील तात्पुरते काम करतात.
आपल्या दातांचे आरोग्य उत्तम असेल तर आपल्याला दातांमध्ये कॅव्हिटी आणि दुर्गंधीची समस्या होत नाही. त्यामुळे दातांचे आरोग्य राखणे हा दुर्गंधीवरचा मूळ उपाय असतो. काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करून तुम्ही दातांचे आरोग्य सुधारू शकता आणि याने आपसूकच तोंडाची दुर्गंधीदेखील कमी होईल. चला तर मग जाणून घेऊया तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते पदार्थ खावे.
हिरव्या पालेभाज्याटीव्ही नाईनने दिलेल्या माहितीनुसार, हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिनरल्स असतात. त्यामुळे या आपलं;या दातांसाठी चांगल्या मानल्या जातात. तुम्ही पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.
व्हिटॅमिन K2असे मानले जाते की, व्हिटॅमिन डी सोबत व्हिटॅमिन के2 दातांपर्यंत कॅल्शियम पोहोचवण्याचे काम करते. दूध. पनीर आणि दही यांसारखे डेअरी प्रोडक्ट आणि चिकनदेखील तुमच्या शरीरातील के2 ची कमतरता भरून काढू शकतात.
व्हिटॅमिन डीसर्वानाच माहित आहे दातांच्या संपूर्ण विकासासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते आणि हे कॅल्शियम दातांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचे असते. व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी मटार, अंडी यांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.
डार्क चॉकलेटचॉकलेट आपल्या दातासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र त्यात साखर नसावी. होय, साखर नसलेले चॉकलेट तुमच्या दातासाठी चांगले असते.