धुलवडीत सर्वत्र रंगांची उधळण हाेत असते. लहानांपासून थाेरांपर्यंत सगळेच जण हा सण उत्साहात साजरा करतात. गेल्या काही वर्षांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे रासायनिक रंग वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहेत. परंतु अनेकांकडून असे रंग वापरण्यात येतात. साधे रंग सुद्धा जाण्यासाठी एक दाेन दिवसांचा कालावधी लागताे. खालील पद्धतीने तुम्ही धुलवडीचा रंग काढू शकता.
रंग खेळून आल्यानंतर लगेच डाेकं धुतलं जातं. परंतु असे केल्याने डाेक्याला लागलेला रंग निघत नाही. त्यामुळे रंग खेळून आल्यानंतर लगेचच केस धुवू नका. त्याआधी केसांना दही किंवा अंड्याचं मिश्रण लावा. त्यामुळे केसांचा रंग काढणे तुम्हाला साेपे हाेईल.
केसाला नारळाचं तेल लावणं हा उत्तम उपाय आहे. यामुळे रंग केसांवर राहणार नाही. आणि तुम्हाला मनसाेक्त रंग खेळता येईल.
रंग खेळून झाल्यानंतर माेहरीच्या तेलाने केसांना मसाज करा. असे केल्याने तुमच्या केसांवरचा रंग लगेचच निघून जाईल.
रंग खेळण्याआधी तुम्ही केसाला ऑलिव ऑईल लावा. अगदी घरातलं नारळाचं तेल लावलं तरी चालेल. यानं रंग केसांमध्ये बसत नाही.
नखांना गडद नेलपाॅलिश लावल्यास नखांवर रंग बसणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नखांची काळजी करावी लागणार नाही.
तुम्हाला जर वाटत असेल की रंग चेहऱ्यावर राहू नये तर रंग खेळण्याआधी चेहऱ्याला आणि हात पायांना माॅश्चरायझिंग क्रिम लावा. याने रंग चेहऱ्यावर बसणार नाही आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्या कामावर पहिल्यासारखे जाऊ शकता.
ओठांना व्हॅसलिन लावल्याने रंग लागणार नाही. आणि ताेंडातही जाणार नाही.
रंग खेळून आल्यानंतर लगेच चेहरा धुवू नका. पहिल्यांदा चेहऱ्याला गव्हाचं पीठ किंवा लिंबू लावून मसाज करा. याने चेहऱ्यावरील कलर जाण्यास मदत हाेईल.
रंग खेळण्याआधी सनस्क्रिम लावून बाहेर पडा. म्हणजे तुम्हाला रंगाची तसेच उन्हाची चिंता करण्याची गरज नाही.