संशोधनाची दुनिया फारच गंमतीशीर आहे, असंच म्हणावं लागेल. कारण दररोज वेगवेगळे आणि विचित्र संशोधनं समोर येत असतात. अशाच एका संशोधनाची सध्या चर्चा रंगली आहे. जगभरात लोक फिट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी वाट्टेल ती धडपड करताना बघायला मिळतात.
कारण या बदलत्या लाइफस्टाइलमध्ये दिवसेंदिवस वजन वाढण्याची समस्या अनेकांना भेडसावत आहे. पण वेगवेगळे उपाय करुनही वजन कमी काही होत नाही. अशात जर आता कुणी म्हणालं की, वजन कमी करण्यासाठी आधी माती खा. तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. कारण एका रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, माती खाऊन वजन कमी केलं जाऊ शकतं.
यूनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलियाने दावा केला आहे की, त्यांनी एका खासप्रकारच्या मातीतील खास गुणांचा शोध लावला आहे. मातीतील या गुणांमुळे वजन कमी केलं जाऊ शकतं. हा रिसर्च यूनिव्हर्सिटीचे पीएचडी करणाऱ्या तान्ही डिनिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांची टीम ड्रग डिलिवरीच्या विषयावर रिसर्च करत होती. यादरम्यान त्यांना आढळलं की, मातीमध्ये आढळणारा एक गुण वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.
फॅट शरीरात जाण्यास रोखते माती
त्यांनी सांगितले की, 'हे खरंच आश्चर्यजनक बाब आहे. रिसर्च दरम्यान असं आढळलं की, या विशेष मातीचे कण चरबीच्या काही कणांना आकर्षित करत होते. केवळ चरबी हे कण माती आकर्षितच करत नव्हती तर ते शरीरात जाण्यापासूनही रोखत होती. जेणेकरुन चरबी केवळ पचन तंत्राकडेच जावी'.
रिसर्च टीमनुसार, ऑर्लीटॅट एक एंजाइम आहे. जे आहारातील ३० टक्के फॅट पचण्याची आणि शोषूण घेण्याची प्रक्रिया रोखतो. याने वजन कमी होतं, पण पोटात दुखतं, पोट फूगतं असे साइड इफेक्टही होतात. त्यामुळे रिसर्च टीम आता यावर अधिक संशोधन करत आहे.
लोकांचं माती खाणं विकार...
तसाही मनुष्य प्राणी हजारों वर्षांपासून माती खातोच. पण जास्तीत जास्त संस्कृतींमध्ये याला विकार मानलं गेलं आहे. पण ही शक्यता अधिक आहे की, येणाऱ्या काळात हे वजन कमी करण्याचं मोठं साधन होईल.
मातीचे असेही फायदे
एकीकडे ऑस्ट्रेलियात वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणारी माती सापडली आहे. तर दुसरीकडे मातीचा आरोग्यासाठी वापर पूर्वीपासून होत आला आहे. म्हणजे मड थेरपीची अलिकडे चांगली प्रचलित झाली आहे. त्याने आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात.
पोटाच्या खालच्या भागावर मड पॅक लावल्यास पचनक्रिया सुधारते. आतंड्यांमधील गरमपणा कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. त्यासोबतच गॅसची समस्या असेल तेव्हाही पोटावर मड पॅक लावल्यास आराम मिळेल. तसेच मड थेरपी डोकेदुखी दूर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. माती कपाळावर लावण्याचा सल्ला दिला जातो. याने डोक्यातील उष्णता दूर होते आणि डोकेदुखी व तणावही दूर होतो.
डायरिया आणि उलटी
पोट बिघडल्यावर मड पॅक फायदेशीर ठरतो. लूज मोशन झाले असतील आणि पोट दुखत असेल तर पोटावर मड पॅक लावा. याने आराम मिळेल. तसेच उलटी होत असल्यास छातीवर मड पॅक लावल्यास उलट्या होणे बंद होते.
ड्राय स्कीनसाठी
ड्राय स्कीन आणि मांसपेशीमध्ये होत असलेल्या वेदनांमुळे हैराण आहात? तर यावर मड थेरपी फायदेशीर आहे. या थेरपीने त्वचेचं सौंदर्य खुलतं सोबतच ही थेरपी अॅंटी एजिंगचं काम करतं. यासाठी शरीराच्या विविध भागावर माती लावली जाते.