शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

Research : ​​...आता मानवी रक्तसाठा अमर्याद उपलब्ध होणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 7:27 AM

रक्तसाठ्याचा तुटवडा पाहता, संशोधकांनी रक्त तयार करणाऱ्या स्टेम पेशींची प्रथमच निर्मिती केली असून यापुढे मानवी रक्तसाठा अमर्याद उपलब्ध होऊ शकतो.

रक्तसाठ्याचा तुटवडा पाहता, संशोधकांनी रक्त तयार करणाऱ्या स्टेम पेशींची प्रथमच निर्मिती केली असून यापुढे मानवी रक्तसाठा अमर्याद उपलब्ध होऊ शकतो. यामुळे रक्तसाठ्याच्या तुटवड्यापासून मुक्तता मिळणार असून रक्तातील आजारांवर उपचार करण्यासाठी याची मोठी मदत मिळणार आहे. स्टेम पेशींपासून रक्ताच्या पेशी तयार करण्याचा आमच्या प्रयत्नाला यश येत असून, आम्ही त्याच्या अतिशय जवळ असल्याचे, अमेरिकेतील मुलांच्या रुग्णालयामधील जॉर्ज डॅले यांनी म्हटले आहे. शरीरातील सर्व पेशी तयार करण्याचे काम स्टेम सेल करतात. शरीरातील एखादी पेशी नष्ट  अथवा खराब झाली असेल तर ती नव्याने तयार करण्याचे काम स्टेम पेशी करतात. या आधारावर रोगप्रतिकारक रक्ताच्या पेशी स्टेम पेशींच्या माध्यमातून तयार करता येऊ शकतात. रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे अतिशय फायदेशीर ठरू शकते, असेही संशोधकांनी म्हटले आहे.पेशींची निर्मिती प्लुरीपोटेन्ट स्टेम पेशींपासून होते. प्लुरीपोटेन्ट स्टेम पेशी अनेक प्रकारच्या मानवी रक्ताच्या पेशी उंदरांमध्ये निर्माण करतात, असे संशोधकांनी सांगितले.या रक्त पेशींची निर्मिती झाल्यामुळे आनुवंशिक रक्ताचे आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. तसेच इतर ठिकाणी रक्ताचा पुरवठा करण्यासाठीही याची मदत होऊ शकणार असल्याचे, जॉर्ज डॅले यांनी म्हटले आहे.