त्वचारोगावर संशोधनात्मक वनस्पती
By admin | Published: September 15, 2015 6:47 PM
आयुर्वेदामध्ये एकाच रोगावर एकच वनस्पती लागू पडत नाही. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रकृती वेगळी असल्याने औषधींची मात्रा लागू पडेल असे नाही. म्हणून व्यक्तीच्या प्रकृतीमानानुसार अनेक औषधी वनस्पती शास्त्रात वर्णन केल्या आहेत. याचे शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट नसल्याने त्या एकत्र करून वापरल्यास त्यातील काही वनस्पती चांगल्याप्रकारे काम करून आजार पूर्णपणे कमी करतात याचा अनुभव आला म्हणून माहिती देत आहे.
आयुर्वेदामध्ये एकाच रोगावर एकच वनस्पती लागू पडत नाही. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रकृती वेगळी असल्याने औषधींची मात्रा लागू पडेल असे नाही. म्हणून व्यक्तीच्या प्रकृतीमानानुसार अनेक औषधी वनस्पती शास्त्रात वर्णन केल्या आहेत. याचे शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट नसल्याने त्या एकत्र करून वापरल्यास त्यातील काही वनस्पती चांगल्याप्रकारे काम करून आजार पूर्णपणे कमी करतात याचा अनुभव आला म्हणून माहिती देत आहे.पांढरे कोड (कोड) - विरुद्ध पदार्थांचे सेवन, मद्य, मास, दही, आम्ल, उडीद, अति संताप, पावबटर, अनुवांशिकता, फास्ट फूड, वातादि दोष कुपीत होऊन रक्त, मास व उदक यांना दूषित करून कोडास उत्पन्न करतात. हल्लीच्या काळात गायीच्या दुधाच्या अभावाने कोडाचे प्रमाण वाढत आहे. अनुवांशिकतेने झालेले कोड कष्ट साध्य समजावे.खैराची अंतरसाल, त्रिफळा, पडवळ, गुळवेल, बातची, शुद्ध गंधर्व, मनशिल, हरमाळ, हळद, टाकळ्यांचे बी, जिरे, अल्प कडुजिरे, पांढरी गोकर्णी, पिंपळी, जाई, हिराकस, वावडिंग, गोरोचन, सैंधव, कावळी, टाकळ्यांचे बी कोष्ट, मुळ्याचे बी, शुद्ध निवडुंग, चित्रक शुद्ध, नागरमोथा, समुद्रफेस, कुटकी, बाहता, करंज, काजळी, कपीला, चंडन, तरतडाचे बी, पांढरी गोकर्णी, रिंगणीची फळे, तेखंड, लोहभाग, पोरतमुळ, जटामासी, काळा माका, चिकणा इत्यादी गोमूत्रात किंवा दुधात घ्यावे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रमाण व काही वनस्पतीची शुद्धी करणे आवश्यक आहे. पांढरे कोड या आजाराची काही कारणे अज्ञात आहेत. यापासून शरीरास अपाय नाही किंवा स्पर्शसंचारही नाही. लोक याला समजतात तेवढा हा भयंकर नाही. फक्त दिसायला त्वचा विरुप दिसते. यापेक्षा या विकारात त्रास नाही. हा विकार दोन प्रकारात दिसतो. एकात त्वचा पांढरी व दुसर्यात त्वचा लालसर असते. या विकाराचा आरंभ ओठ, कंबर, डोळ्यांच्या पापण्या, हात-पायाला एखादा वाटोळा डाग येतो. डाग असलेल्या जागेवरचे केस पांढरे होऊन गळू लागतात. तेव्हा हा कष्टसाध्य होतो. दहा-पाच ठिकाणी लहान-मोठे डाग लवकर बरे होतात. ओठावरील व तळहातावरील डाग लवकर जात नाहीत. समाजाने या रोगाविषयी भलताच गैरसमज करून घेऊ नये व रुग्णानेसुद्धा मनात न्यूनगंड बाळगू नये. कारण हा आजार नसून लक्षण आहे. त्याचे इतरांना व आपणास काही दुष्परिणाम होत नाही. तेलकट, तिखट, आंबट विरुद्ध अन्न (केळाचे शिकरण, मध, तूप, दही, लसूण एकत्र करणे.) तसेच मांस, अंडी इत्यादी पदार्थ न खाता वरील औषधाची मात्रा घेतल्याने हा विकार बरा जरी झाला नाही तरी वाढणार नाही असे मला वाटते.