बालपणी आपल्यापैकी अनेकांनी च्युइंगम खाल्ल्यावर आईचा ओरडा खाल्ला असेल. आताही अनेकजण सिगारेट ओढल्यावर किंवा जेवण झाल्यावर च्युइंगम खातात. या च्युइंगमचा दातांना कसा फायदा होतो, याबाबत एका रिसर्चमधून समोर आलं आहे. या रिसर्चमध्ये अभ्यासकांना आढळलं की, च्युइंगम चघळल्याने दातांना किड लागत नाही किंवा किड वाढू देत नाही. अभ्यासकांच्या या टीममध्ये एक भारतीय अभ्यासकही आहे.
(Image Credit : flushinghospital.org)
या रिसर्चचे मुख्य लेखक किंग्स कॉलेज लंडनमध्ये प्राध्यापक असलेले भारतीय वंशाचे अविजीत बॅनर्जी म्हणाले की, लाळेची उत्तेजना ज्या दातांमध्ये किड आहे आणि ज्या दातांना किड नाही अशा दोन्ही दातांसाठी एक नैसर्गिक रक्षक म्हणून काम करते. तर च्युइंगम चघळल्याने एका दातांचं इन्फेक्शन दुसऱ्या दातांमध्ये पसरण्यास रोखतं.
शुगर-फ्री च्युइंगम जॅलिटॉल आणि सोर्बिटॉलसहीत अॅंटी-बॅक्टेरिअल तत्वांना कॅव्हिटीपर्यंत पोहोचवण्याचं कामही करतं. ज्यामुळे एका दाताची किड दुसऱ्या दातांना लागत नाही. अभ्यासक सांगता की, या विश्लेषणाआधी अशाप्रकारचे कोणतेही पुरावे नव्हते, ज्यात किड पसरणे रोखण्यात आणि शुगर फ्री च्युइंगम चघळल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत संबंध दाखवला गेला असेल.
(Image Credit : scitechdaily.com)
या रिसर्चदरम्यान गेल्या ५० वर्षांत प्रकाशित रिसर्चचं विश्लेषण करण्यात आलं. त्यातील १२ रिसर्च शोधून काढले आणि त्यांची तुलना करण्यात आली. ज्यांमध्ये ओरल हेल्थ कंडिशन, शुगर फ्री गम चघळण्याचा प्रभाव आणि कॅव्हिटी वाढण्याची कारणे व्यवस्थि सांगण्यात आले होते. या रिसर्चमध्ये लहान मुलं आणि मोठ्यावर करण्यात आलेल्या रिसर्चचा समावेश करण्यात आला होता.
तुलनात्मक अभ्यासानंतर असं आढळून आलं की, शुगर फ्री गम चघळल्याने किड वाढ रोखण्यात २८ टक्के फायदा एकट्या गम चघळल्याने झाला होता. गेल्या काही वर्षात शुगर फ्री च्युइंगम चघळणे दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या रिसर्चबाबत बॅनर्जी यांनी पुढे सांगितले की, आम्हाला आमच्या रिसर्चमध्ये आढळून आलं की, शुगर फ्री गम चघळल्याने दातांची किड रोखण्यात आणि ओरल हेल्थ चांगली ठेवण्यात मदत मिळते.