घरातून काम करणाऱ्यांपैकी ४२ टक्के नागरिकांना मणका, पाठ आणि कंबरेशी संबंधित आजार जडल्याचं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून दिसून आलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलं होतं. आता कोरोनाचा उद्रेक ओसरू लागला असला तरी अनेक कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. मात्र वर्क फ्रॉम होम करणाऱ्या ४१ टक्के लोकांना पाठीच्या मणक्याशी संबंधित आजार जडल्याचं एका अभ्यासातून दिसून आलं आहे.
अभ्यासाधील निरीक्षणंवर्क फ्रॉम होमच्या परिणामांबाबत पीएमसी लॅबनं केलेल्या अभ्यासानुसार ४१.२ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचे आजार तर २३.५ टक्के नागरिकांना मानेशी संबंधित आजार पजडल्याचं दिसून आलं आहे. घरात सतत एकाच जागी कामासाठी बसणं, तासन् तास जागेवरून न उठणं, स्ट्रेचिंग न करणं, कामानंतरही एकाच जागी बसून राहणं यासारख्या कारणांमुळे हे आजार वाढल्याचं चित्र आहे.
सांगितले हे उपायरिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार घरातून काम करणाऱ्या प्रत्येकानं दर तासाला किमान ६ मिनिटांचा ब्रेक घेणं गरजेचं आहे. हे केलं तर पाठीच्या मणक्यावर येणारा ताण आणि त्याचे दुष्परिणाम यांचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्याशिवाय रोजच्या रोज चाईल्ड पोज, कॅट आणि काऊ पोज, योगासनं हे व्यायाम करण्याचा सल्ला या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे.
यामुळे होते मानदुखीवर्क फ्रॉम होम करणाऱ्या अनेकांना मानदुखीचाही त्रास सतावू लागला आहे. डोकं आणि पाठ यांच्या दरम्यान असणाऱ्या सव्हॉइकल व्हर्टेब्रावर तणाव आल्यामुळे मानदुखीच्या त्रासाची सुरवात होते. यामुळे खांदा आणि पाठीच्या पेशींवरील तणावदेखील वाढत असतो. त्यामुळे मानदुखी ही भविष्यातील खांदे आणि पाठदुखीची पूर्वसूचना मानली जाते. मान दुखत असेल किंवा अवघडत असेल, तर तातडीने स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सिंगचा व्यायाम सुरु करण्याचा सल्ला या अभ्यासात देण्यात आला आहे. रोजच्या रोज चालणं आणि योगासनं हा व्यायाम केला, तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना बहुतांश लाईफस्टाईल आजारांपासून दूर राहता येईल, असंही या अभ्यासात म्हटलं आहे.