शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

Research : चिरकाल तरुण ठेवणारे औषध तयार होणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2017 6:12 AM

चिरकाल तरुण ठेवणारे म्हणजेच वार्धक्याला दूर ठेवणारे औषध येत्या दोन-तीन वर्षात तयार करणे शक्य असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

-Ravindra Moreआपण तरुणच राहावे, म्हणजे वार्धक्य यायलाच नको असे प्रत्येकाला वाटते. मात्र जसे वय वाढत जाते तशी वृद्धापकाळाची जाणीव होऊ लागते. बहुतांश वार्धक्य कुणालाच आवडत नाही. नेहमी तारुण्य टिकविण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक संशोधनही केलेत पण आतापर्यंत यश मिळाले नाही. मात्र लोमोस्कोव मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी व स्वीडनची स्टॉकहोम युनिव्हर्सिटी यांनी मायटोकाँड्रियाची वार्धक्याच्या प्रक्रियेतील नेमकी भूमिका शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार चिरकाल तरुण ठेवणारे म्हणजेच वार्धक्याला दूर ठेवणारे औषध येत्या दोन-तीन वर्षात तयार करणे शक्य असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संशोधनात वैज्ञानिकांनी उंदरांमध्ये वार्धक्याची प्रक्रिया लांबवणारे कृत्रिम संयुग तयार केले आहे. कृत्रिम अँटिआॅक्सिडंट असलेल्या एसकेक्यू १ या संयुगाच्या मदतीने मायटोकाँड्रियावर प्रयोग करण्यात आले. जनुक संस्कारित उंदरावर त्याचे प्रयोग करण्यात आले असून त्याच्या जिनोममध्ये उत्परिवर्तन घडवून म्युटाजेनेसिसला उत्तेजन देण्यात आले होते. त्यामुळे या उंदरांमध्ये वार्धक्याची प्रक्रिया लवकर होऊन तो उंदीर नेहमीच्या जीवनकालाऐवजी दोन वर्षांत मरत असे. त्यामुळे वयामुळे होणारे विकार उंदरांना होत असत. १०० दिवस वयाच्या जनुकीय उंदरापासून एसकेक्यू १ या संयुगाचे प्रयोग करण्यात आले. वैज्ञानिकांच्या मते त्यात मायटोकाँड्रियातून निघणाऱ्या मुक्तकणांपासून पेशींचे रक्षण होते. उंदरांच्या दोन गटांवर २०० ते २५० दिवस प्रयोग करण्यात आले. ज्या उंदरांमध्ये हे संयुग वापरले नव्हते ते लवकर वृद्ध झाले. काही उंदरांमध्ये वार्धक्याने शरीराचे तापमान कमी होणे, मणक्याला बाक येणे, त्वचा खराब होणे असे परिणाम वयानुसार दिसून येतात. शिवाय आॅक्सिजनचे वहन बरोबर होत नाही. हे संशोधन महत्त्वाचे असून त्यामुळे मायटोकाँड्रियाची वार्धक्यातील भूमिका समजली आहे, असे लोमोनोसोव मॉस्को स्टेट विद्यापीठाचे व्लादिमीर स्कुलाचेव यांनी सांगितले. यातून वृद्धत्वाची प्रक्रिया रोखणारे औषध दोन-तीन वर्षांत तयार करता येऊ शकेल.