(Image Credit : keckmedicine.org)
अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभ्यासकांनी हाय ब्लड प्रेशर आणि ग्लूकोमा आजारात वापरल्या जाणाऱ्या १८ प्रकारच्या औषधांचा वापर करून किडनी स्टोनवर सोपा उपाय शोधल्याचा दावा केलाय. या औषधांचे काही मिश्रण तयार करून असं औषध तयार केलं गेलं ज्याने स्टोनचा आकार कमी होऊ तो वेगाने बाहेर येऊ शकतो. अभ्यासकांनुसार हे औषध कॅथेटर द्वारे थेट मूत्रवाहिनीत पोहोचवलं जाऊ शकतं. अभ्यासकांचं मत आहे की, जर मूत्रवाहिनीचा आकार थोडा वाढवला तर स्टोन सहजपणे बाहेर पडू शकतो.
लॅबमध्ये झाली औषधांची टेस्ट
रिसर्च टीममध्ये सहभागी किडनी स्टोन प्रोग्रामचे निर्देशक मायकल सीमा आणि ब्रायन इस्नर म्हणाले की, अभ्यासकांनी पहिल्यांदा उच्च रक्तदाब किंवा ग्लूकोमा सारख्या आजारांचा उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या १८ औषधांची निवड केली. नंतर ही औषधे प्रयोगशाळेतील एका डिशमधील मानव मूत्रवाहिनीच्या पेशींसोबत संपर्कात आणण्यात आले. यातून हे बघण्यात आलं की, हे चिकट औषधे मांसपेशींच्या पेशींना किती आराम देतात. याचा रिझल्ट बराच चांगला होता.
१ अब्ज पेशींचं विश्लेषण
रिसर्च टीमने असा विचार केला की, औषधे थेट मूत्रवाहिनी का पोहोचवू नये? याने ट्यूब रिलॅक्स तर होईलच, सोबतच शरीरावरील संभाव्य नुकसानही कमी केलं जाऊ शकतं. त्यानंतर अभ्यासकांनी जवळपास १ अब्ज पेशींचं विश्लेषण करण्यासाठी कम्प्यूटेशनल टेक्निकचा वापर केला. तसेच त्यांनी दोन अशा औषधांची निवड केली ज्या अधिक चांगलं काम करतील.
यातून त्यांना असं आढळून आलं की, दोन्ही औषधे एकत्र दिल्यावर अधिक चांगलं काम करतात. यातील एक निफेडिपिन आहे. या कॅल्शिअम चॅनल ब्लॉकरचा उपयोग उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी केला जातो आणि तर दुसरं औषध हे ग्लूकोमाच्या उपचारासाठी वापरलं जातं.
स्टोन काढण्याचा वेळही ठरू शकतो
या प्रयोगासाठी एका सिस्टोस्कोपचा उपयोग करून औषधे थेट मूत्रवाहिनीमध्ये रिलीज केली होती. जी एका कॅथेटरसारखी आहे आणि एक कॅमेरासोबत जुळली जाऊ शकते. सोबतच संभावित दुष्परिणामांची शक्यता अजिबातच राहत नाही. रिसर्चमध्ये पुढे शोधलं जात आहे की, या औषधांमुळे मांसपेशींना कितीवेळ रिलॅक्स ठेवलं जाऊ शकतं. सोबतच स्टोन कितीस लवकर बाहेर काढला जाऊ शकतो.