हृदयाच्या क्रियांवर लक्ष ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी ई-टॅटू विकसित केला आहे. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, हा ई-टॅटू फिटनेस ट्रॅकरपेक्षा अधिक चांगलं काम करतो. हा ई-टॅटू टेक्सास युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी तयार केला आहे. हा टॅटू ईसीजी आणि एससीजी करून हृदयाशी संबंधित माहिती यूजरपर्यंत पोहोचवतो.
पातळ आणि ओढल्या जाणाऱ्या सेन्सरचा वापर
वैज्ञानिकांनुसार, ई-टॅटूमध्ये फार पातळ आणि सहजपणे ओढल्या जाणाऱ्या सेन्सरचा वापर केला गेला आहे. हा मार्केटमधील फिटनेस ट्रॅकरपेक्षा चांगला आहे. कारण यात फिलामेंट्री सर्पेटाइन पॉलिविनायल फ्लोराइडचा वापर केला गेला आहे. ज्याने हा टॅटू फार हलका होतो. या कारणाने हा जास्त काळासाठी वापरला जाऊ शकतो.
हार्ट बीटची माहिती मोबाइलवर मिळणार
ई-टॅटू एका जाळीप्रमाणे दिसतो. याची लांबी ३८.१ मिमी आणि रूंदी ६३.५ मिमी आहे. हा टॅटू छातीवर चिकटवला जातो. तसेच हा स्मार्टफोनशी कनेक्टेड असतो. हार्टबीट सामान्य आहे किंवा नाही अशी हृदयाशी संबंधित माहिती फोनवर पाठवून वेळीच योग्य ते उपचार घेता येतील. आता वैज्ञानिक याला वायरलेस पद्धतीने चार्ज करण्याची नवी पद्धत तयार करण्यावर काम करत आहेत. त्यासोबतच डिवाइसचा डेटा स्टोर करण्याच्या प्रक्रियेतही सुधार केला जात आहे.
यात एससीजी फीचर आहे
प्राध्यापक नॅन्शू यांच्यानुसार, हृदयरोगांची माहिती मिळवण्यासाठी केवळ ईसीजी पुरेसं नाहीये. त्यामुळेई-टॅटूमध्ये एससीजीचं फीचर देण्यात आलं आहे. सध्या मार्केटमध्ये एससीजी फीचर असलेले फिटनेस ट्रॅकर उपलब्ध आहेत. पण जड असल्याकारणाने जास्त काळासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकत नाही.
छातीत व्हायब्रेशन असलेल्या भागात लावलं जाईल
ई-टॅटूमध्ये थ्रीडी डिजिटल इमेज को-रिलेशन टेक्नीकचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नीकच्या मदतीने हे जाणून घेता येतं की, छातीच्या कोणत्या भागात व्हायब्रेशन होत आहे, जिथे ई-टॅटू लावला तर चांगला परिणाम दिसेल.