अलिकडे लोक पेनकिलर गोळयांचं अधिक सेवन करतात. त्यात साधारणपणे ट्रामडोलचं सेवन केलं. पण या गोळीचं सेवन अधिक केल्याने हिप फ्रॅक्चरचा धोका वाढू शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सहभाग घेतलेल्या तज्ज्ञांनी सांगितले की, ट्रामडोलचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. कारण याचं फार जास्त सेवन कराल तर हिप फ्रॅक्टरचं कारण ठरू शकतं. खासकरून ५० पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक बघितली गेली आहे.
पेनकिलर आणि हिप फ्रॅक्चर
सतत किंवा गंभीर वेदना झाल्यावर ट्रामाडोलचं सेवन अनेकजण करतात. अनेक डॉक्टर्सही या गोळ्या घेण्याचा सल्ला देतात. पण रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, ट्रामाडोलचं सेवन केल्याने फ्रॅक्चरचा धोका होतो. त्यामुळे याचं अधिक प्रमाणात सेवन करू नये.हिप फ्रॅक्टर आणि ट्रामाडोलमधील संबंध समजून घेण्यासाठी अभ्यासकांनी यूनायटेड किंगडममधील ५० वयापेक्षा लोकांचा रिसर्चमध्ये समावेश केला होता. या लोकांना कधीच हिप फ्रॅक्चर, कॅन्सरसारखी समस्या झाली नव्हती. या रिसर्चमध्ये १७ वर्षाच्या उपलब्ध डेटाबेसचा देखील वापर करण्यात आला. या रिसर्चमध्ये ५६.९ टक्के महिलांचा देखील समावेश होता.
काय आढळलं रिसर्चमधून?
या रिसर्चदरम्यान एक वर्ष फॉलोअपमध्ये १, ४६, ९५६ लोकांपैकी ५१८ लोकांमध्ये हिप फ्रॅक्चर आढळून आला. ज्यामुळे अन्य पेनकिलरच्या तुलनेत ट्राडामोलने हिप फ्रॅक्चरचा धोका अधिक होत असल्याचं सांगण्यात आलं.
या रिसर्चचे मुख्य गुंआगुंआ लेई यांनी सांगितले की, 'हिप फ्रॅक्चरची कारणे, त्यामुळे होणारा मृत्यू दर आणि यावर होणाऱ्या खर्चावर लक्ष देणं गरजेचं आहे. जसे की, रिसर्चदरम्यान ट्राडामोल आणि हिप फ्रॅक्चरमध्ये संबंध आढळून आला. अशा स्थितीत हेच करावं की, ट्राडामोलचं सेवन काळजीपूर्वक आणि कमी करावं.