तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. पण ते तेलही योग्य प्रकारे वापरणं गरजेचं असतं. जर तुम्ही एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरत असाल तर ते शरीरासाठी घातक ठरतं.
बाजारात मिळणारे समोसे, भजी यांसारखे पदार्थ तयार करण्यासाठी एकच तेल सारखं वापरलं जातं. अनेकदा उरलेल्या तेलामध्ये आणखी नवीन तेल टाकून तेच तेल पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येतं. घरातही बऱ्याचदा आपण पदार्थ तळल्यानंतर उरलेलं तेल काढून ठेवतो आणि तेच तेल चपाती किंवा पराठा तयार करताना वापरतो. पण असं करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.
शिल्लक राहिलेल्या तेलाचा तुम्ही जर दुसरे पदार्थ तळण्यासाठी पुन्हा वापर करत असाल तर त्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार जडण्याची शक्यता वाढते. तेल वारंवार गरम केल्यामुळे हळूहळू त्यातील रॅडिकल्स वाढतात आणि ते तेलातील अॅन्टीऑक्सिडंट नष्ट करतात. त्यामुळे कॅन्सरचे विषाणू जन्म घेतात आणि पदार्थ तयार करताना त्या तेलातून पदार्थांमध्ये जातात. असे पदार्थ खाल्यानं हेच विषाणू पदार्थातून आपल्या पोटात जातात.
पुन्हा पुन्हा तेच तेल वापरल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार जडण्याची शक्यता वाढते. हे शरीरासाठी अत्यंत घातक असतं. पावसाळ्यात वातावरणामध्ये ओलावा असतो. त्यामुळे पदार्थांमध्ये बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुले डॉक्टर वारंवार पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं टाळण्यास सांगतात.