कोरोना व्हायरसचे जगावरील संकट संपले, असे घोषित करण्याची तयारी डब्ल्यूएचओ करू लागले होते. तोवर चीन, हाँगकाँग, इटलीसह अनेक युरोपीय देशांमध्ये पुन्हा कोरोनाने हाहाकार पसरविण्यास सुरुवात केली होती. हे कमी की काय म्हणून नव्या रिनो व्हायरसने हजेरी लावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हायरसची लक्षणे कोरोनासारखीच असल्याने रुग्ण शोधणेदेखील कठीण बनले आहे.
ब्रिटनमध्ये या व्हायरसचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. डेली मिररनुसार कोरोना व्हायरसची तीन लक्षणे या नव्या व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. खोकला येत असून, चव आणि वास घेण्याची क्षमता बाधित होत आहेत. याचबरोबर तापही येत आहे. हीच सामान्य लक्षणे कोरोनाची असल्याने तज्ज्ञदेखील बुचकळ्यात पडू लागले आहेत.
जगभरात रिनो व्हायरस (Rhinovirus) चे संक्रमण वाढण्यास सुरुवात झाली आहे. याची लक्षणे कोरोनाशी मिळती जुळती आहेत. ही लक्षणे असली आणि कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली तर धोक्याची घंटा असू शकते, या रुग्णांना रिनोव्हायरसची लागण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ब्रिटनच्या आरोग्य विभागाने दोन्ही व्हायरसमधील फरक समजण्यासाठी गाईडलाईन जारी केली आहे. याद्वारे लोकांना जागरुक केले जात असून ही महामारी रोखता येऊ शकते. अशाप्रकारची लक्षणे दिसताच आणि कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तरी डोकेदुखी, गळ्यात खवखव आणि नाक वाहण्याची समस्या सुरु असेल तर ही रिनोव्हायरसची लक्षणे असल्याचे म्हटले आहे. यामुळे अशा लोकांनी लगेचच होम आयसोलेट व्हावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
याचबरोबर रुग्णाने त्याची भांडी, कपडे आदी गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. घरातल्यांना नव्या व्हायरसची लागण होऊ नये याची काळजी घ्याली, असे म्हटले आहे. फॅमिली डॉक्टरकडून उपचार करून घ्यावेत असेही म्हटले आहे.