विनोदाचा तडका 'कॅ री ऑन देशपांडे'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:10 AM
'कॅरी ऑन देशपांडे'च्या कलाकारांनी 'लोकमत' कार्यालयाला भेट दिली.
मला साधे सरळ चित्रपट विशेष आवडत नाहीत. त्यापेक्षा निराळं काहीतरी दाखवणारं, त्रांगड करायला लावणारं काम करायला मी पसंती देतो. हा चित्रपटही संपूर्णपणे अशाच काहीशा कथेवर बेतलेला आहे. त्यामुळे हा चित्रपट मला आव्हानात्मक वाटला.- विजय पाटकर, दिग्दर्शक सीमाप्रमाणेच माझादेखील हा पहिलाच चित्रपट आहे. आणि पहिल्याच चित्रपटामध्ये पुष्कर श्रोत्रींच्या म्हणजे अगदी त्या सगळ्या संशयी असल्या तरी त्यांच्या अनेक पत्नींपैकी एका पत्नीची भूमिका साकारली आहे.- स्नेहल गोरे, अभिनेत्री हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि मी शशी देशपांडेंच्या अनेक बायकांपैकी एका बायकोची भूमिका साकारली आहे. लहानपणापासून मी विजय सरांना टीव्हीवर सर्वांना हसवताना अनेकदा पाहिलं आहे. पण या चित्रपटाच्या निमित्ताने मला त्यांच्याकडून बरचं काही शिकता आलं.- सीमा कदम, अभिनेत्री मी शशी देशपांडेच्या भाचीची भूमिका साकारत असून, नको त्या वेळेला मध्येमध्ये करणारं हे पात्रं आहे. या भूमिकेमुळे चित्रपटातील सर्वच कलाकारांकडून मला खूप काही शिकायला मिळालं याचा विशेष आनंद आहे.- हेमलता बाने, अभिनेत्री लहानपणापासून विजय सरांसोबत काम करायची माझी इच्छा होती. आणि ती कॅरी ऑन देशपांडेच्या निमित्ताने पूर्ण झाली याचा मला विशेष आनंद आहे. त्यांनी या चित्रपटात माझ्यातील अभिनेत्रीला खेचून बाहेर काढलं आहे असचं मला म्हणावं लागेल. कारण नृत्यांगना ही माझी ओळख असताना त्यांनी माझ्याकडून त्यांना पाहिजे तसा अभिनय करून घेतला आहे.- मानसी नाईक, नृत्यांगना व अभिनेत्री मी यामध्ये प्रमुख भूमिकेत असून महिलांना आधार देणार्या शशी देशपांडे हे विनोदी पात्र मी साकारलं आहे. आजूबाजूला घडणार्या दूषित वातावरणापासून एका वेगळ्याच कॉमेडी विश्वात नेणारा, एकापेक्षा अनेक बायका करणारा आणि त्यांना मानसन्मान देऊन नांदवणारा अशा काहीशा अघटित, कल्पित घटना पाहायला मिळणारा हा चित्रपट आहे.- पुष्कर श्रोत्री, अभिनेता आमच्याकडे २ ते ३ स्क्रिप्ट्स आल्या होत्या. पण त्यामधील 'कॅरी ऑन देशपांडे'ची कथा मला आवडली आणि या चित्रपटाची निर्मिती करायचा निर्णय मी घेतला.- गणेश रामदास, निर्माते काही नवरे किंवा महिला एका जन्मातच आपल्या साथीदाराला कंटाळतात, सात जन्म कुठे एकाच माणसाबरोबर राहणार, दोन बायका एकत्र नांदू नाही शकत, चार-चार कुठे राहणार, अशा अनेक जोक्सना सध्या सोशल मीडियावर पेव फुटले आहेत. जोक्स अपार्ट पण एक पुरुष साधारणत: किती दयावान असू शकतो याचा काही अंदाज लावू शकता? किंवा एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल आणि त्यामुळे तिचं लग्न होत नसताना तर एखादा विवाहित पुरुष तिच्याशी लग्न करतोय असं चित्र कुठे पाहिलं आहे का? आणि ते पण एकदा नाही बरं.. अनेकदा. नाही ना! मग आता पाहा. घाबरू नका.. असं कोणी प्रत्यक्षात करायला जात नाहीये. तर तुम्ही हे पाहू शकणार आहात 'कॅरी ऑन देशपांडे' या चित्रपटात. हा चित्रपट आजच संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय पाटकर, निर्माते गणेश रामदास, अभिनेता पुष्कर श्रोत्री, नृत्यांगना व अभिनेत्री मानसी नाईक, हेमलता बाने, सीमा कदम व स्नेहल गोरे यांनी शनिवारी लोकमत कार्यालयाला भेट दिली.