शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

भात आणि चपातीचं एकत्र सेवन आरोग्यास हानिकारक ठरतं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 10:16 AM

भात आणि चपाती  एकत्र खाण्याची पद्धत भारतात फार जुनी आणि जास्त पाळली जाणारी आहे. जास्तीत जास्त लोक जेव्हाही जेवण करतात तेव्हा भात आणि चपाती एकत्र खातात.

(Image Credit : Dr Shikha's NutriHealth)

भात आणि चपाती  एकत्र खाण्याची पद्धत भारतात फार जुनी आणि जास्त पाळली जाणारी आहे. जास्तीत जास्त लोक जेव्हाही जेवण करतात तेव्हा भात आणि चपाती एकत्र खातात. पण ज्यावेळी पचन तंत्र कमजोर होऊ लागतं किंवा वजन कमी करण्याचा विषय निघतो, तेव्हा लोकांना या प्रश्नाबाबत जाणून घ्यायचं असतं. डाएट एक्सपर्ट्स सांगतात की, एकत्र भात आणि चपाती खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. चला जाणून घेऊ याबाबत आणखी काही गोष्टी...

भात-चपाती एकत्र का खाऊ नये?

(Image Credit : Reddit)

द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, भात-चपाती एकत्र का खाऊ नये? असा प्रश्न विचारला गेल्यावर याचा थेट संबंध कॅलरी काऊंटशी जोडला जातो. कारण जेव्हा भात आणि चपाती एकत्र खाण्यात येते तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅलरी घेत असता. आणि तुम्ही अधिक कॅलरी असलेला आहार घेता तेव्हा पचन तंत्रांवर अधिक जोर पडतो.

(Image Credit : fitnessstay)

भात आणि चपाती एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कमजोर होते. तसेच शरीरात फॅट जमा होऊ लागतं आणि यानेच पुढे लठ्ठपणाची समस्या होते. तुम्हीही असंच काहीसं करत असाल आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही पद्धत वेळीच बंद करा. काही रिसर्चमधूनही ही बाब समोर आली की, भात आणि चपाती जेव्हाही खायची असेल तर दोन्हीपैकी एकच एकावेळी खावं.

रात्रीच्या जेवणात काय असावं?

वजन कमी करणाऱ्यांना पडणार हा आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर फार चिंतेची बाब नाही. कारण याचं उत्तर सोपं आहे. रात्री जेवण हे नेहमी पचायला हलकं असंच करावं. ही बाब तुम्हाला कळाली तर तुम्ही भात आणि चपाती यातील निवड करण्यास मोकळे होऊ शकता.

(Image Credit : Bon Appetit)

डाएट एक्सपर्ट्सही हेच सांगतात की, भाताच्या तुलनेत चपती पचायला हलकी आहे. जर तुम्ही रात्री चपाती खात असाल तर ती सहज पचते. पण जर रात्री तुम्ही भात खात असाल तर तुम्हाला चांगली झोप येणार नाही. चांगली झोप न येणे आणि पचनक्रिया विस्कळीत होणे, यामुळे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो.

रात्री भात का खाऊ नये?

भात खाल्ल्याने अनेकांचं पोट फुगतं. Water retention ची समस्या असलेल्या लोकांनी तर अजिबात भात खाऊ नये असे सांगितले जाते. कारण भात खाल्ल्याने त्यांना अधिक समस्या होऊ शकते. तसेच त्यांना भात पचण्यासही अधिक वेळ लागतो. 

(Image Credit : Nutree)

अनेकांना भाताची अ‍ॅलर्जी असते. डायबिटीसच्या रूग्णांनी भात खाऊ नये असे सांगितले जाते. तसेच अस्थमा असलेल्या लोकांनी सुद्धा भात खाऊ नये. याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न