- मयूर पठाडेआपण कायमच ऐकत आलोय, भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं, जाडेपणा येतो. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचंय किंवा चुकूनही आपल्या शरीरावरची चरबी अगदी मिलिमिटरनंही वाढू द्यायची नाही, असे सारेच लोक पहिल्यांदा भाताला अडगळीत टाकतात. आपल्या आहारातून भात अक्षरश: हद्दपारच करून टाकतात.याचं कारण आपण कायमच ऐकत आलोय, वजन वाढू द्यायचं नसेल, तर भाताला दूर ठेवा. बºयाचदा डॉक्टरही तोच सल्ला देतात.पण एक लक्षात घ्या, भाताला आपल्या आयुष्यातूनच हद्दपार केलं तर काय होईल?अनेक उपयुक्त घटकांना आपण मुकू.आणखी दुसरं एक वास्तव.जगात भात हे असं एकच अन्न आहे, जे जवळपास संपूर्ण जगात वापरलं जातं.माणसाला जगवण्याची ताकद भातात आहे. ब्राऊन राईस तर आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे. त्यामुळे साध्या भाताऐवजी हातसडीचा तांदुळ जर आपण वापरला तर तो आपलं आयुष्य आणखी वाढवील.आणि आपण म्हणतो, त्याप्रमाणे भातामुळे माणसं जर जाड होत असतील, तर मग भात खाणारी जगातली सारीच माणसं जाड झाली असती.अगदी आपल्या भारतातही भात हे मुख्य अन्न असलेले अनेक भाग आहेत. त्यांच्या जेवणात रोज सकाळ संध्याकाळ भात असतो. ही लोकं मग सगळी लठ्ठच असायला पाहिजे होती. ती तशी नाहीत, कारण आपली संकल्पना, समजूत चुकीची आहे.अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला, तर त्याचे दुष्परिणाम होतीलच. मग तो भात असू द्या, नाहीतर आणखी काही..
भातामुळे लठ्ठपणा वाढत नाही कमी होतो!..१- वजन वाढीला कारणीभूत ठरणारे, त्याचबरोबर आपल्या शरीराला हानीकारक ठरतील असे कोणतेही घटक भातात नाहीत.२- कोलेस्टोरॉल, सोडियम यासारखे घटकही भातात नाहीत.३- भात हे खरं तर बॅलन्स्ड डाएट आहे.४- शरीरावर कोणतेही नकारात्मक परिणाम होऊ न देता, तुम्हाला पोषक तत्त्व मिळवून देणारा भात खरंतर खूपच उपयुक्त आहे.५- आणखी एक महत्त्वाचं. जगात केवळ भात हा असा एकच अन्नपदार्थ आहे, जो अगदी थोड्या प्रमाणात खाल्ला तरी तुम्हाला जिवंत ठेऊ शकतो. नुसतं जिवंतच नाही, आरोग्यदायीदेखील..भाताचे आणखीही बरेच उपयोग आहेत..त्याबद्दल पाहू या पुढच्या भागात..