Coconut Water In Winter : नारळ पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. नारळ पाण्याचे शरीर हायड्रेट राहतं आणि भरपूर एनर्जी मिळते. नारळ पाण्यामध्ये अनेक पोषक तत्वेही असतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. मात्र, अनेकांना प्रश्न पडत असतो की, हिवाळ्यात नारळाच पाणी प्यावं की नाही? चला जाणून घेऊ...
नारळ पाण्यातील पोषक तत्व
नारळ पाण्यामध्ये प्रोटीन, गुड फॅट, कार्बोहायड्रेट्स, फायबर, आयर्न, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फॅटी अॅसिडचं प्रमाण भरपूर असतं. याच्या सेवनाने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.
हिवाळ्यात नारळ पाणी पिणं योग्य की अयोग्य?
सर्दी-खोकला
थंडीच्या दिवसात सकाळी आणि सायंकाळी नारळाचं पाणी प्याल तर सर्दी आणि खोकल्याची समस्या होण्याचा धोका असतो. एक्सपर्ट्स सांगतात की, नारळाचं पाणी थंड असतं, त्यामुळे थंडीच्या दिवसात हे दुपारी प्यावं.
ब्लड प्रेशर
थंडीच्या दिवसात ब्लड प्रेशर जास्त प्रभावित होतं. यादरम्यान नारळाचं पाणी पिऊ नये. नारळाच्या पाण्यात ब्लड प्रेशर डाउन करण्याचे गुण असतात. पण जास्त पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर हाय सुद्धा होऊ शकतं.
लूज मोशन
कोणत्याही गोष्टीची अति केली तर शरीरासाठी नुकसानकारक असते. त्यानुसार जर नारळाचं पाणी जास्त प्याल तर लूज मोशनची समस्या होऊ शकते. शरीरात पाण्याचं प्रमाण वाढलं की असं होतं.
नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ
नारळ पाणी रिकाम्या पोटी किंवा दुपारी पिणं अधिक चांगलं मानलं जातं. नारळाचं पाणी प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्याशिवाय डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. सकाळी नारळ पाणी प्याल तर हार्टबर्न, अॅसिडिटी आणि मॉर्निंग सिकनेस दूर होतं. मात्र, हिवाळ्यात नारळ पाणी दुपारी प्यावे. नारळ पाण्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होतात ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.