Eating cucumber right way: उन्हाळ्यात ताजी आणि थंड काकडी खाण्याची मजाच वेगळी असते. काकडी खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्व आणि पाणी मिळतं. लोक वेगवेगळ्या पद्धतीने काकडीचं सेवन करतात. पण काकडी फायदे शरीराला मिळण्यासाठी काकडी सेवन योग्य पद्धतीने करणं महत्वाचं आहे. याबाबत लोकांना फारसं माहीत नसतं. त्यामुळे जास्तीत जास्त लोक याचं चुकीच्या पद्धतीने सेवन करतात. आज आम्ही तुम्हाला काकडी खाण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
उन्हाळ्यात काकडी खाण्याचे फायदे
काकडी हे एक लो कॅलरी फूड आहे. काकडी खाल्ल्याने शरीराटा मेटाबॉलिक रेट वाढतो. त्यामुळे याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. काकडीचं सेवन केल्याने त्वचा चांगली राहते आणि चमकदार होते. काकडी खाल्ल्याने शरीराचं तापमान संतुलित राहतं.
आयुर्वेदानुसार काकडी सेवन कधी करावं?
भरपूर पोषक तत्व असूनही काकडीचं सेवन करणं काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. जसे की, कफ दोष असलेल्या लोकांनी काकडीचं सेवन करू नये. कारण याच्या सेवनाने सर्दी-खोकला आणि कफ वाढण्याची समस्या वाढू शकते.
साल काढून खाऊ नका
एक्सपर्ट्सनुसार, काकडी कधीच साल काढून खाऊ नये. यात भरपूर पोषक तत्व असतात. जसे की, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के. हे तत्व शरीराची कमजोरी दूर करतात आणि केसांनाही पोषण देतात.
काकडी खाण्याची योग्य वेळ
एक्सपर्ट्सनुसार सकाळी रिकाम्या पोटी काकडी खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो. तेच याने शरीर हायड्रेटेड राहतं. रात्री काकडीचं सेवन करू नये. कारण यात भरपूर पाणी असतं. रात्री काकडी खाल्ल्यावर तुम्हाला कफाची समस्या होऊ शकते.