Western Toilet Using Tips : आजकाल जास्तीत जास्त घरांमध्ये आणि ऑफिसेसमध्ये वेस्टर्न टॉयलेट सीटचा वापर केला जातो. पण लोक या टॉयलेटचा फार चुकीच्या पद्धतीने वापर करतात आणि त्यामुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. या फार सामान्य चुका असतात ज्यांकडे लक्ष दिलं नाही तर तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.
भारतीय टॉयलेट सीट वापरणाऱ्या लोकांच्या तुलनेत वेस्टर्न टॉयलेट वापरणाऱ्या लोकांना इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. अशात लोकांनी स्वच्छतेवर अधिक लक्ष दिलं पाहिजे. लोकांना वेस्टर्न टॉयलेट सीटचा योग्य वापर कसा करावा हे माहीत असलं पाहिजे.
काय आहे टॉयलेट प्लूम?
एनसीबीआयनुसार, टॉयलेट झाल्यावर जेव्हा आपण फ्लश करतो तेव्हा वेगाने येणाऱ्या पाण्यासोबत हवेत वायरस आणि बॅक्टेरिया पसरतात. ज्यांना प्लूम म्हटलं जातं. फ्लश जेव्हा जोरात केला जातो तेव्हा बॅक्टेरिया आणि वायरस हवेत पसरतात जे बाथरूममध्ये सगळीकडे पसरतात. तुमचा टॉवेल, टूथब्रश सगळ्यांवर ते बसतात. जे तुमच्या शरीरात जातात.
फ्लशमध्ये बॅक्टेरिया
केवळ विष्ठेच्या माध्यमातून बॅक्टेरिया आणि वायरस निघतात असं नाही तर टॉयलेटच्या फ्लशमध्येही बॅक्टेरिया असतात. ज्यांना ई-कोली बॅक्टेरिया म्हटलं जातं. फ्लश केल्याने हे बॅक्टेरिया सुद्धा हवेत पसरतात आणि जवळपास 6 तास हवेतच राहतात. यांच्या संपर्कात आल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो.
वॉटर ड्रॉप्स
फ्लशमधून निघणारे थेंबांना वॉटर ड्रॉप्स म्हटलं जातं. फ्लश करताना हे दिसत नाहीत. पण त्यांमध्ये भरपूर बॅक्टेरिया असतात. जर तुम्ही टॉयलेटचं झाकण बंद न करता फ्लश करत असाल तर हे बॅक्टेरिया नाकावाटे शरीरात जातात.
गंभीर आजारांचा धोका
बाथरूममधील बॅक्टेरियांमुळे उलटी, एफ्लूएंजा आणि कोरोना सारखे खतरनाक आजार होऊ शकतात. तसेच डायरियाचा धोकाही अधिक असतो. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, दरवाज्यांचं हॅंडल, लिफ्टचं बटण, शॉपिंग कार्ट यामुळेही इन्फेक्शनचा धोका वाढतो.
काय काळजी घ्याल?
- टॉयलेटचा वापर करताना नेहमीच एक गोष्टी ध्यानात ठेवा की, हात साबणाने चांगले स्वच्छ करा.
- हात धुतल्याशिवाय चेहरा, डोळे आणि तोंडावर लावू नका.
- नियमितपणे बाथरूम स्वच्छ करा.
- टॉयलेटचं झाकण बंद करूनचं फ्लश करा.