रिमा लागू: धोकेदायक "कार्डियक अरेस्ट" ने झाला मृत्यु, ही आहेत लक्षणे !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 6:29 AM
आईची दमदार भूमिका साकारण्यारी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचे ‘कार्डियक अरेस्ट’ च्या कारणाने मृत्यु झाला. गेल्या काही काळापासून या कारणाने मृत्यु होणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे. चला जाणून घेऊया याविषयी.
-Ravindra Moreआईची दमदार भूमिका साकारण्यारी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचे ‘कार्डियक अरेस्ट’ च्या कारणाने मृत्यु झाला. हे ऐकून संपूर्ण देशात पुन्हा चर्चा सुरु झाली की, गेल्या काही काळापासून या कारणाने मृत्यु होणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे. चला जाणून घेऊया याविषयी.* काय असतो कार्डियक अरेस्ट?कार्डियक अरेस्ट म्हणजे अचानक ह्रदयाचे काम करणे बंद होणे होय. विशेष म्हणजे हा आजार दिर्घ काळाचा नसतो, याासाठी ह्रदयाशी संंबंधीत असलेल्या आजारांपेक्षा याला खूपच धोके दायक मानले जाते. * ह्रदय विकाराच्या झटक्यापेक्षा असतो वेगळालोक याला ह्रदय विकाराचा झटकाच समजतात, मात्र कार्डियक अरेस्ट ह्रदय विकाराच्या झटक्यापेक्षा वेगळा असतो. तज्ज्ञांच्या मते, कार्डियक अरेस्ट तेव्हा होतो, जेव्हा ह्रदय शरीराच्या चारही बाजूंनी रक्तसंचार करणे बंद करते. मेडिकल नियमांनी म्हटले तर ह्रदय विकार सर्कु लेटरी समस्या आहे आणि कार्डियक अटॅक इलेक्ट्रिक कंडक्शनमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे होतो. आपल्या छातीत दुखायला लागले की, ह्रदय विकाराच्या झटक्यादरम्यानच याप्रकारचे दुखते असे आपण समजतो, मात्र तज्ज्ञांच्या मते, असे दुखणे हार्ट बर्न किंवा कार्डियक अटॅकच्या कारणानेही होऊ शकते. * का आहे धोकेदायककार्डियक अरेस्टमध्ये ह्रदयाचे ब्लड सर्कुलेशन पुर्णत: बंद होते. ह्रदयाच्या आत वेंट्रीकुलर फाइब्रिलेशन निर्माण झाल्याने याचा परिणाम ह्रदयाच्या ठोक्यांवर होतो. यामुळे कार्डियक अरेस्टमध्ये काही मिनिटातच मृत्यु होतो. * काय आहेत लक्षणेकार्डियक अरेस्ट अचानकच होतो. विशेष म्हणजे ज्यांना ह्रदयासंबंधी आजारपण आहे, त्यांना कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता जास्त असते. कधी-कधी कार्डियक अरेस्ट अगोदर छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, पल्पीटेशन, चक्कर येणे, शुद्ध हरपणे, थकवा किंवा ब्लॅकआउट होऊ शकते. * काय आहे उपचार याच्या उपचारासाठी रुग्णास कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (सीपीआर) दिले जाते, ज्यामध्ये ह्रदयाच्या गतीला नियमित केले जाऊ शकते. शिवाय या रुग्णांना ‘डिफाइब्रिलेटर’ने विद्युत शॉक देऊन हार्ट बीटला नियमित करण्याचा प्रयत्न केला जातो. Also Read : ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन