आजकाल आपला आहार फार अनहेल्दी झाला आहे. तेलकट, मसालेदार, बाहेरचे पदार्थ अधिक खाल्ले जातात. लाइफस्टाईलही चुकीची झाली आहे. लोक एक्सरसाइजला वेळ देत नाहीत. अशात कमी वयातच हाय कोलेस्ट्रॉल-डायबिटीससारख्या गंभीर समस्या होतात. हाय कोलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये प्लाक जमा होतं तर डायबिटीस झाल्यावर रक्तात ग्लूकोजचं प्रमाण वाढतं. अशात डॉक्टर या समस्या दूर करण्यासाठी वांग्याची भाजी खाण्याचा सल्ला देतात.
कसं कराल सेवन?
हाय कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस दूर करण्यासाठी वांग्याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. वांगी कोळशावर किंवा आसेवर भाजून खाल्ली तर याचे फायदे मिळतात. भाजल्यामुळे वांग्याची शक्ती दुप्पट होते. कारण यात नुकसानकारक तत्व नसतात. पण एलर्जीच्या रूग्णांनी यांचं सेवन करू नये.
कोलेस्ट्रॉल-ट्रायग्लिसराइड नष्ट होतं
भाजलेली वांगी खाऊन एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड कमी केलं जाऊ शकतं. एका प्रयोगात उंदरांना भाजलेली वांगी देण्यात आली तेव्हा त्यांच्यातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी झालं. मनुष्यांनाही याचा फायदा मिळू शकतो.
डायबिटीस होईल कमी
डायबिटीसच्या रूग्णांनीही वांगीचं सेवन करायला हवं. रिसर्चनुसार, यातील फायबर शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतं.
पोट होईल कमी
ज्या लोकांना वाढलेली चरबी आणि वजन कमी करायचं आहे. त्यांनीही वांगी नक्की खावी. कारण वांगी खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि भूक कमी लागते. यादरम्यान कॅलरी इनटेक कंट्रोल केलं जाऊ शकतं. ज्यामुळे वजन कमी होतं.
अनेक आजारांपासून बचाव
सामान्यपणे सगळ्या आजारांमागे इंफ्लामेशन आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. यांच्यापासून बचाव करण्यासाठी अॅंटी-ऑक्सिडेंट्सची गरज पडते. वांगी खाल्ल्याने हे तत्व भरपूर मिळतात.